शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी कळंबा तलावातील गाळ काढणार

By admin | Updated: March 20, 2016 01:05 IST

चंद्रकांतदादा पाटील : जलयुक्त शिवार अभियानातून कामास सुरुवात; तलावाच्या सुशोभीकरणास मदत

कळंबा : ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल. यासाठी जी यंत्रसामग्री लागेल, ती दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली. कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथील कळंबा तलाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून राज्य २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. २०१५-१६ ला सरकारने जलयुक्त शिवार अभियानावर १४०० कोटी रुपये खर्च केले, तर यावर्षी २०१६-१७ ला एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्याचबरोबर २५ हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे, तर पाच लाख सोलर पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच, कळंबा तलावातील गाळ काढण्यात येत आहे. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल. सतेज पाटील म्हणाले, कळंबा तलावाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी आणखी यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. तीन महिन्यांच्या आत काम करण्यास जलसंपदा विभागाला सांगितले आहे. कोणतेही राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून हे काम व्हावे. उन्हाळ्यात कळंबा ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी महापालिका कुठे कमी पडणार नाही. अमल महाडिक म्हणाले, या तलावातील ५० हजार क्युबिक मीटर गाळ काढायचा आहे. काही मदत लागेल ती देऊ. कळंबा तलावासाठी चंद्रकांतदादा पाटील यांची मदत झाली. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ५७५ कामे सुरू आहेत, तर २८ कोटी ४० लाखांचा आराखडा तयार आहे.