शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

दोन्ही उमेदवारांकडून तीसजणांनी घेतले पैसे!

By admin | Published: December 31, 2015 11:44 PM

वसुली होणार : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतील प्रकार

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ज्यांनी दोन्हींकडून पैसे घेऊन एका उमेदवाराची फसवणूक केली, अशा तीस मतदारांवर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे समजते. त्यांच्याकडून ज्यांना त्या मतदारांना मतदान केलेले नाही, त्याचे पैसे परत द्यावेत, असा दबाव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.या निवडणुकीत ३८२ मतदार होते. त्यापैकी सतेज पाटील यांनी २३५ मतदारांना सहलीवर नेले होते. उर्वरित १४७ पैकी काहीजण सहलीवर गेले नव्हते व सुमारे शंभराहून अधिक मतदारांना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सहलीवर नेले होते. प्रत्यक्ष निकालात सतेज पाटील यांना २२० मते मिळाली व महाडिक यांना १५७ मते मिळाली. याचा अर्थ सतेज यांच्याकडील किमान पंधरा मतदारांनी महाडिक यांना मतदान केले आहे. या दोघा उमेदवारांकडून पैसे घेतले; परंतु एकालाच मतदान केले असे किमान तीस मतदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता वसुलीची मोहीम तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यांनी दोघांकडून पैसे घेऊन सतेज पाटील यांना मतदान केले, त्यांनी महाडिक यांचे पैसे परत द्यावेत व ज्यांनी महाडिक यांना मतदान केले त्यांनी सतेज पाटील यांचे पैसे परत द्यावेत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. निकालानंतर आता हे वसुलीचे कवित्व सुरू झाले आहे. गडहिंग्लज परिसरात दुसरीच एक चर्चा सुरू आहे. त्या परिसरातील एका नेत्याने सदस्यांना देतो म्हणून एकत्रित रक्कम उचलली व त्यापैकी सदस्यांना कमी देऊन काही रक्कम स्वत:च खिशात घातल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्याशिवाय ज्या पाच मतपत्रिका बाद झाल्या, त्यामागील मेंदू कुणाचा, याचीही विचारणा होत आहे. दोघांकडून पैसे घेतल्याने मानसिक दडपणाखाली मतदान कुणाला द्यायचे, याविषयी संभ्रम तयार झाल्यावर काहींनी दुसरा-तिसरा पसंती क्रम देऊन मतदान केल्याचे पुढे आले आहे.