कोल्हापूर : पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून कौलगे (ता. कागल) येथील पांडुरंग मारुती पाटील या तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगांव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल संशयित नाझनीन अजिज देसाई (वय ४३ रा. संभाजीनगर )हिच्यासह चौघांना शुक्रवारी करवीर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सागर शरद भोसले (३१ रा. बस्तवडे ता. कागल), सुनीता दादासाो खवरे (सध्या रा. खंडोबा तालीम , शिवाजी पेठ, मूळ राहणार शिरोली पुलाची ता. हातकणंगले), महावीर लक्ष्मण कांबळे (४५ रा. वंदूर ता. कागल) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने नाझनीन देसाईसह तिघांना ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पैसे दामदुप्पटीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक
By admin | Updated: August 1, 2014 23:24 IST