शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्र्थींकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला

By admin | Updated: August 7, 2014 00:23 IST

मिरज पंचायत समितीमधील घटना : पश्चिम भागातील महिला सदस्याचा प्रताप

मिरज : मिरज पंचायत समितीने खरेदी केलेल्या कडबाकुट्टी यंत्रासाठी पश्चिम भागातील एका महिला सदस्येचा लाभार्र्थींकडून जादा पैसे उकळण्याचा सुरू असलेला प्रयत्न सदस्यांनी आज (बुधवारी) हाणून पाडला. सदस्यांनी कडबाकुट्टी यंत्रासाठी पन्नास टक्के रकमेच्या माहितीचा फलक लावण्यासही कृषी अधिकाऱ्यांना भाग पाडले.मिरज पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत. सध्या पंचायत समितीत उपलब्ध असणाऱ्या कडबाकुट्टी यंत्राचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप सुरू आहे. कडबाकुट्टी यंत्रासाठी ८ हजार ५०० रुपये व शेतकरी मासिकांसाठी २०० रुपये असे एकूण ८ हजार ७०० रुपये पन्नास टक्के रक्कम भरावयाची आहे. प्रत्येक सदस्याच्या वाट्याला १० कडबाकुट्टी यंत्रे आली आहेत. सदस्यांच्या शिफारशीने वाटप सुरू आहे. असे असताना पन्नास टक्के अनुदानापेक्षा जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे लाभार्र्थींच्या तक्रारीवरून उघडकीस आले. पश्चिम भागातील लाभार्र्थींना कडबाकुट्टीसाठी १२ हजार रुपये भरावे लागतील, अशी सक्ती करण्यात आली होती. लाभार्र्थींनी थेट पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधला असता, संबंधित महिला सदस्याकडून जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लाभार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंचायत समितीच्या सदस्यांकडेही खासगीत तक्रारी केल्यामुळे विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, सतीश निळकंठ, दिलीप बुरसे, शंकर पाटील या सदस्यांनी या लुबाडणुकीची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांना कोणत्याही सदस्यांच्या सांगण्यावरून अनुदान रकमेपेक्षा जादा पैसे घेऊ नयेत, अशी सूचना दिली. तसेच भरावयाच्या रक मेच्या माहितीचा फलक लावण्यासही भाग पाडले. सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे परस्पर जादा पैसे उकळण्याचा महिला सदस्येचा प्रयत्न उधळला. याची पंचायत समितीमध्ये जोरदार चर्चा होती. (वार्ताहर)