शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले तालुक्यातील खासगी सावकार मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST

हातकणंगले : तालुक्यामध्ये जमीन, मालमत्ता, वाहन, व्यवसाय यासह सर्वच क्षेत्रामध्ये खासगी सावकारी फोफावली आहे. बेरोजगार युवक, गावगुंड आणि खासगी ...

हातकणंगले : तालुक्यामध्ये जमीन, मालमत्ता, वाहन, व्यवसाय यासह सर्वच क्षेत्रामध्ये खासगी सावकारी फोफावली आहे. बेरोजगार युवक, गावगुंड आणि खासगी भिशी चालकांच्या टोळक्याच्या माध्यमातून व्याजावर व्याज वसुलीचा मोठा व्यवसाय जोर धरत असून तालुका सहकार विभागाकडून कार्यालयाकडे तक्रारीच दाखल नसल्याचा निर्वाळा दिला जात आहे. यामुळे खासगी सावकारीवर अंकुश कोणाचा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यामध्ये ७६ सावकारांची नोंदणी उपनिबंधक कार्यालयाकडे आहे. प्रत्येकवर्षी सावकरी परवाना नूतनीकरण करताना वर्षभर गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात शासनाला फी परतावा भरणा करून परवाना नवीन घेतला जातो. शासनमान्य सावकारापेक्षा चोरीचुपे सावकारी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खासगी सावकारांकडून सुशिक्षित बेरोजगार, गावगुंड, खासगी भिशी चालक यांना कामाला जुंपले जात आहे. अशा टोळक्याकडून धमकावणे, बळजबरी करणे, लुबाडणूक करणे, दस्तऐवज लिहून घेणे असे प्रकार राजरोस सुरू असून समाजातील प्रतिष्ठा, बेअब्रू आणि नाचक्कीच्या भीतीपोटी अनेक गरजू तक्रारीला फाटा देत आहेत.

चौकट

सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक नेमण्याचे अधिकार संस्था चालकांना दिले असल्यामुळे याचा गैरफायदा संस्थाचालक घेत असून तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावामधील सहकारी पतसंस्था, अन्य सहकारी संस्थांकडील शिल्लक रकमा, सभासद वर्गणी, बुडित ठेवीचा वापर खासगी सावकारीसाठी केला जात आहे. संस्थाचालकाच्या पाठिंब्यावर हा व्यवसाय जोम धरत असून नाममात्र गहाण खत करून लाखो रुपयांचा निधी सावकारी पाशामध्ये अडकविला जात आहे. यावरही सहकार विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

कोट

=

खासगी सावकारीतून पिळवणूक आणि सहकारी संस्थांकडील निधी सावकारीमध्ये याबाबत आपल्या कार्यालयाकडे तक्रारी दाखल नाहीत. खासगी सावकारीमध्ये अडकलेली कुटुंबे, व्यक्ती यांनी तालुका सहकार विभागाकडे तक्रारी दाखल कराव्यात, तात्काळ कारवाई करून सावकारावर गुन्हे दाखल करू तक्रारदारांनी पुढे येण्याची गरज आहे.

- डॉ. प्रगती बागल . उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले