शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाबाबत मोदींनी माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:47 IST

कोल्हापूर : परदेशातील काळा पैसा भारतात आणून सामान्य माणसाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये भरण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले; पण आता परदेशात काळा नव्हे तर ‘पांढरा पैसा’ असल्याचा साक्षात्कार अर्थमंत्री अरुण जेटली व नरेंद्र मोदी यांना झाला आहे. त्यांनी खोटे बोलून जनतेला फसविले असून, याबद्दल देशाची माफी ...

कोल्हापूर : परदेशातील काळा पैसा भारतात आणून सामान्य माणसाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये भरण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले; पण आता परदेशात काळा नव्हे तर ‘पांढरा पैसा’ असल्याचा साक्षात्कार अर्थमंत्री अरुण जेटली व नरेंद्र मोदी यांना झाला आहे. त्यांनी खोटे बोलून जनतेला फसविले असून, याबद्दल देशाची माफी मागावी, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली. बोगस शेतकऱ्यांची बैठक घेऊन ‘एफआरपी’ची पुनर्रचना केली, तर ऊसपट्ट्यात ‘कमळ’ औषधालाही ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.राजू शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत शेतकºयांची बैठक घेऊन आगामी हंगामात एफआरपी वाढीबाबत सूतोवाच केले; पण या हंगामाची अगोदरच एफआरपी निश्चित केली जाते. भाजपला मानणाºया शेतकºयांना तेही प्रश्न न विचारण्याच्या अटीवर बैठकीसाठी बोलावले. बैठकीचे नुसते नाटक असून वाढीव एफआरपी परवडत नसल्याने साखर कारखानदारांच्या आडून नरेंद्र मोदींनी ‘एफआरपी’चा ९.५ टक्के ऐवजी १० टक्के बेस करण्याचा घाट घातला आहे; त्यामुळे दोनशे रुपये नव्हे केवळ ५५ रुपयेच वाढीव एफआरपी मिळणार आहे. बोगस शेतकºयांची बैठक घेवून ‘एफआरपी’ची पुनर्रचना कराल तर ऊसपट्ट्यात ‘कमळ’ औषधालाही ठेवणार नाही. दीडपट हमीभावाची मखलाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद करावी.बैठक नव्हे, सत्कारदेशातील शेतकºयांना शेतीमालाच्या दराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले नव्हते, तर शेतकºयांच्या वतीने सत्कार करून घेण्यासाठीच ही बैठक होती. एवढी वाईट वेळ पंतप्रधानांवर आल्याची टीका शेट्टी यांनी केली.थकीत एफआरपी द्यावीच लागेलशेतकºयांची थकीत एफआरपी द्यावीच लागेल; त्याचबरोबर आगामी हंगामात वाढीव एफआरपीमुळे शॉर्टमार्जिन झाले तर ते कसे भरून काढायचे हा कारखानदारांचा प्रश्न आहे. साखरेचा दर २९०० ऐवजी ३१०० रुपयांवर निश्चित करावा. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असेही शेट्टी यांनी सांगितले.बापट यांनी मका शेतकºयांना द्यावामक्याची भाकरी अपवादाने खाल्ली जाते. अन्नपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांना मका खपवायचा असल्यास त्यांनी पशुखाद्यासाठी द्यावा, शेतकरी घेण्यास तयार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.निर्णय फसलाराज्य सरकारने दूध पावडर उत्पादन करणाºया दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. दोन महिन्यांत सरकारचे यावर ५३ कोटी खर्च होऊनही पावडरचे दर पडलेले आहेत. सरकारचा हा निर्णय फसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.मुंबईकर दुधासाठी तडफडतील११ वर्षांपूर्वी दूध दरवाढीसाठी असाच संघर्ष केला होता, त्यावेळी मुंबईकडे जाणारे दूध रोखले होते. अहमदाबाद, नाशिक व पुणे या तिन्ही मार्गाने मुंबईत जाता येते, तिथेच नाकाबंदी करून मुंबईत एक थेंबही दुुधाचा सोडणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.दूध अनुदानासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊराज्य सरकारने १५ जुलैपर्यंत गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अन्यथा १६ जुलैपासून बेमुदत दूध संकलन बंद करण्यात येईल. मुंबईला जाणाºया सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून दुधाचा थेंबही जाऊ देणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.खासदार शेट्टी म्हणाले, दुधाचे खरेदी दर कमी झाल्याने गाय दूध उत्पादक कमालीचा अडचणीत सापडला आहे. या संकटाची पूर्वसूचना दीड वर्षापूर्वी केंद्रीय कृषिमंत्र्यांना दिली होती. त्याला सावरण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी २९ जून रोजी दुग्ध आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शेजारील राज्यांप्रमाणे दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत राज्य सरकारने १५ जुलैपर्यंत निर्णय घ्यावा. राज्यात रोज एक कोटी लिटर गाय दूध उत्पादन आहे. प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी पाच कोटी लागतात. त्यासाठी सरकारने ४५० कोटींची मदत करणे अपेक्षित आहे.डेन्मार्क, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियामध्ये असेच संकट आहे, तेथील शेतकºयांनी गार्इंचे संगोपन बंद करून कत्तलखान्याकडे पाठवल्या, येथे तेही करता येत नाही. केंद्र सरकारने अतिरिक्त पावडर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करणे अपेक्षित होते; पण तसे न केल्याने पेच निर्माण झाला. दूध संघांनाही आवाहन आहे, आमच्या लढाईत त्यांनी साथ द्यावी. आमच्या आडवे येऊ नका. सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आंदोलनाचा वणवा पेटणार असून त्याच्या तयारीसाठी कोल्हापुरात ६ जूलै रोजी दूध उत्पादकांचा मेळावा घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, भगवान काटे, आदी उपस्थित होते.