पेठवडगाव : येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गांधीगिरी करत दुचाकीस्वारांना गुलाबाचे फूल देऊन वाढीव इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष संतोष वडेर, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष अजित मोरे, तालुका कार्याध्यक्ष शहाबाज मकानदार, अजित खोत, रमेश दबडे, शहराध्यक्ष प्रीतम मुधाळे, संदेश भोसले, धनाजी पाटील, केतन सूर्यवंशी, सुनील पोवार, रोहन दबडे, शाम पाटील, साजिद शेख आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळ : पेठवडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसने गांधीगिरी करत इंधन दरवाढीचा निषेध करताना दुचाकीस्वारांना गुलाबाचे फूल दिले. यावेळी रोहित पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष संतोष वडेर, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष अजित मोरे आदी उपस्थित होते.