शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

प्रचारात आरोपांची चिखलफेक

By admin | Updated: October 8, 2014 21:47 IST

घराघरांपर्यंत प्रचार : मुश्रीफ-घाटगे यांच्यातच हातघाईची लढाई

जहॉँगीर शेख - कागल - विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी विविध माध्यमांद्वारे प्रचार यंत्रणा राबविण्यात आघाडी घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी प्रचाराचा भपका न करता थेट भेटी-गाठीवर जोर ठेवला आहे. इतर सात उमेदवारांत भाजपचे परशुराम तावरे प्रचारात सक्रिय दिसत आहेत.आठवड्यावर मतदान येऊन ठेपले आहे. कागल तालुक्यात गावागावांतील कार्यकर्ते या गटातून त्या गटात प्रवेश करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, गडहिंग्लज, उत्तूर भागातील प्रमुख कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळविण्याकडे मुश्रीफ-घाटगेंचे अधिक लक्ष आहे. जयवंतराव शिंपींसारखा मोहरा परत मुश्रीफांनी आपल्या बाजूने सक्रिय केला आहे, तर गडहिंग्लज शहरातील जनता दलाचे पाठबळ मिळविण्यासाठी संजय घाटगे गट प्रयत्न करीत आहे. मात्र, स्वाती कोरी या चंदगडमधून लढत असल्याने या गटाचे लक्ष तिकडे अधिक आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करीत असलेल्या मुश्रीफांना जिल्ह्याच्या राजकारणातील निर्णयांची प्रतिक्रिया बघावयास मिळाली आहे.बाळासाहेब कुपेकर यांच्यानंतर निवेदिता माने यांचे चिरंजीव सत्त्वशील माने यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राजेखान जमादार हे तर सुरुवातीपासूनच आक्रमक झालेले आहेत. या मुद्द्यांचा आपल्या प्रचारासाठी उपयोग करून घेण्याची संधी संजय घाटगेंनी दवडलेली नाही. मात्र, मुश्रीफांनी हे विषय संयमाने हाताळीत, जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहेत. माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी संजय घाटगेंची उमेदवारी जाहीर केल्याने तो गट घाटगे गटाबरोरबर प्रचारात सक्रिय आहे. प्रा. मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, अमरीष घाटगे, तसेच अरुंधती घाटगे, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे हे प्रचार दौरे काढून संजय घाटगेंसाठी मते मागत आहेत. दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांसाठी ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, समरजितसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ आक्रमकपणे प्रचार करीत आहेत, तर साजीद मुश्रीफ, सायरा मुश्रीफ, नबीला मुश्रीफ, अमरीष मुश्रीफ हे कुटुंबीयही प्रचार दौरे करून मते मागत आहेत.स्थानिक केबलवर माहितीपटाचे प्रसारण सुरू आहे. जाहीर सभा तसेच पदयात्रा, हळदी-कुंकू, महिला मेळावे असे कार्यक्रम सुरू आहेत. आपल्या कार्याची माहिती देणारा माहितीपट मुश्रीफांच्यावतीने गावागावांत दाखविला जात आहे. प्रचार गाणी, घोषणांच्या गाड्या फिरत आहेत. जिल्हा परिषदनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका, मंथन सुरू आहे. गावाच्या चौकात कार्यकर्त्यांचे घोळके दिसत आहेत. माहितीपुस्तिका, ध्वज, बॅनर, पताका, टी शर्ट अशी प्रचार यंत्रणेतील मुश्रीफांची आघाडी स्पष्ट दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला संजय घाटगेंच्याही जाहीर सभा, महिला मेळावे, पदयात्रा, प्रचाराच्या गाड्या दिसत आहेत. मात्र, महत्त्वाचा फरक म्हणजे मोजके कार्यकर्ते घराघरांत जाऊन लोकांना भेटत आहेत. गर्दी आणि लक्ष वेधण्याचे प्रकार टाळत आहेत.प्रचारातील मुद्देमतदारसंघाचा झालेला विकास आणि पारदर्शकतामोफत आॅपरेशन्स, पेन्शन योजना, इतर शासकीय योजना, समाजमंदिरे, देवालयांची उभारणी, पूर्ण-अपूर्ण कामेमूठभर व्यक्तींचाच झालेला विकासजात-धर्म मुद्द्यांचा वापर होत असल्याचे आरोपतालुक्याची संस्कृती, क्षमता, कार्यक्षमता, उमेदवाराची कामाची पद्धत, जनतेशी संपर्कगटा-तटाचे राजकारण, वैयक्तिक हेवे-दावेपंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि बेरोजगारी