शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल शॉपी फोडली

By admin | Updated: September 21, 2014 00:51 IST

३५ लाखाचे मोबाईल लंपास : लक्ष्मीपुरी, शिवाजी रोडवरील घटना

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरी, शिवाजी रोडवरील स्टार लाईट मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून सुमारे ३५ लाख किमतीचे मोबाईल हॅँडसेट लंपास केल्याचा प्रकार आज, शनिवारी सकाळी उघडकीस आला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घरफोडी झाल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले, शिवाजी रोडवर अब्दुल रशीद महंमद हनिफ बागवान (वय ४८, रा. घाटगे कॉलनी, कदमवाडी) यांची स्टार लाईट मोबाईल शॉपी आहे. नेहमीप्रमाणे काल, शुक्रवारी दहाच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता कुलपे तोडून शटर अर्धवट उचकटलेले दिसले. शटर उघडून त्यांनी आतमध्ये पाहिले असता मोेबाईलचे बॉक्स विस्कटलेले दिसून आले. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा केला. चोरट्यांनी बॉक्समधील मोबाईल हॅँडसेट घेऊन चार्जर व माहितीपुस्तिका तिथेच टाकून दिली होती. दुकानात सुगंधी स्प्रे मारल्याने श्वान आतमध्ये जाऊ शकले नाही. ठसेतज्ज्ञांनी काचेवरील बोटांचे ठसे घेतले आहेत. सुमारे ३५ लाख किमतीचे २०० च्यावर मोबाईल हॅँडसेट चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)