कसबा बावडा : बावडा महोत्सवानिमित्त शिवसेना विभागीय कार्यालयातर्फे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्र्धेत झेंडा चौक स्पोर्टस्ने अजिंक्यपद पटकावले. विजेत्या संघाला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रोख २१ हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात आले. रविवारी कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राऊंड येथे अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मॉर्टीन स्पोर्टस्वर झेंडा चौक स्पोर्टस्ने आठ विकेटस्नी विजय मिळविला.उपविजेत्या मॉर्टीन स्पोर्टस्ला रोख ११ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरणवेळी शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, सुनील जाधव, भीमराव बिरंजे, धनंजय मोहिते, सुहास डोंगरे, एन. टी. वाडकर, मोहन सालपे, अशोक जाधव, राजीव चव्हाण, अक्षय खोत, सचिन पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार चषक झेंडा चौक स्पोर्टस्कडे
By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST