शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मुखशुद्धीचा सुवास ‘बडीशेप’

By admin | Updated: November 9, 2014 23:30 IST

महिन्याला सव्वा टनाची आवक : सर्वाधिक वापर घरगुती मसाल्यांमध्ये; सर्वाधिक मागणी कोकणात

सचिन भोसले-कोल्हापूर -घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी , घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते. विविध रंगांच्या बडीशेपच्या गोळ्या मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानमध्ये वापरल्या जातात. याचबरोबर मसाले पानात हमखास असणारा पदार्थ म्हणून बडीशेपकडे पाहिले जाते. कोल्हापूरच्या मसालेबाजारात दर महिन्याला सव्वा टन इतक्या बडीशेपची आवक होते. अशा या बडीशेपचे उपयोग आणि वापर जाणून घेऊ ‘लोकमतसंगे.’बडीशेपचे झाड कोरड्या वाळूरहित मातीमध्ये समुद्र किंवा मोठ्या नदीपात्राजवळ उत्तमरीत्या उगवते. बडीशेपच्या झाडाचा बुंधा हा फुगीर असून, काही भागांमध्ये त्याची भाजी करूनही खाल्ली जाते. बडीशेपची झाडे साधारण अडीच मीटर इतक्या उंचीपर्यंत वाढतात. झाडाला देखील विशिष्ट वास असतो. बडीशेप जगभरात बहुतांश ठिकाणी उगवते. त्यात रानटी बडीशेप आणि नियमित साधी बडीशेपही असते. बडीशेपची पाने-फुले काही ठिकाणी भाजी करून, तर काही ठिकाणी कच्च्या स्वरूपात खाल्ली जातात. इटली, अमेरिका येथे तर शोभेचे झाड म्हणूनदेखील घराच्या सजावटीत त्याला स्थान आहे. बडीशेपचा वापर खऱ्या अर्थाने १९व्या शतकात मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला. युरोप, कॅनडा, अमेरिका, आशिया, आॅस्ट्रेलिया येथे बडीशेपपासून मद्यनिर्मिती केली जाते. बडीशेप उत्पादनात भारत राजा आहे. भारतात मागील वर्षी सव्वा लाख मेट्रिक टन उत्पादन घेण्यात आले. त्याखालोखाल मेक्सिको, चीन, इराण, बल्गेरिया यांचा क्रमांक लागतो. अमेरिकेमध्ये रानटी बडीशेपच्या बारीक फुलांचा वापर पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये केला जातो. या फुलांना महत्त्व तर आहेच; पण त्यांचा समावेश मसाल्यामध्ये किंवा मसाल्याचा एक प्रकार म्हणून केला जातो. सुकलेली बडीशेप जी हिरव्या आणि तपकिरी रंगामध्ये आढळते. जसजशी बडीशेप जुनी व अधिक सुकत जाते, तसा तिचा रंग फिकट होत जातो. जेवणात वापरण्याकरिता हिरवट रंगाच्या बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपचे कंद ही पातीच्या कांद्याप्रमाणे दिसतात. कोवळी असल्याने व मंद सुवासामुळे त्यांचा वापर विविध ठिकाणी केला जातो. बडीशेपचा वापर आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने सॉस, टूथपेस्ट, सूप्स, आदींमध्ये केला जात आहे. भारत व पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान या देशांत पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये बडीशेपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात काश्मिरी व गुजराथी पदार्थांमध्ये बडीशेप महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. आसाम, बंगाल, ओडिशा येथे पाच विविध मसाले महत्त्वाचे मानले जातात. त्याला ‘पंच पोहरण’ म्हटले जाते. त्यात बडीशेप असते. भारतात बडीशेप भाजून जेवणानंतर खाण्यास मुखवास म्हणून घेतली जाते. बडीशेपचा वापर बऱ्याच मांसाहारी तसेच शाकाहारी जेवणांमध्ये आवर्जून केला जातो. सध्या हर्बल टीचे खूप फॅड आहे. त्यातही बडीशेप वापरली जाते. जेवण रुचकर होण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये बडीशेपचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोवा, कारवार या ठिकाणी माशांच्या कालवणाच्या जेवणात बडीशेप हमखास वापरली जाते. खाऊच्या साध्या व मसाले पानांत बडीशेप वापरली जाते. कोल्हापुरात लखनवी आणि साधी अशा दोन प्रकारांत बडीशेप विक्रीसाठी येते. विविध रंगांत आणि फ्लेवरमध्ये बडीशेप विक्रीलहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणून बडीशेपला साखरेचे आवरण दिले जाते. अशा बारीक गोळ्यांच्या स्वरूपात, विविध रंगांत आणि फ्लेवरमध्ये बडीशेप विक्रीसाठी ठेवली जाते. याचबरोबर मुखशुद्धीसाठी सुपारी, बडीशेप आणि ज्येष्ठमध, पाचक यांची पावडरही जेवणानंतर खाण्यासाठी करून ठेवली जाते. अशा पद्धतीच्या बडीशेपच्या पावडरीही बाजारात उपलब्ध आहेत. बडीशेपचा वापर घरगुती मसाल्यांमध्ये अधिकबडीशेप म्हटले की, प्रथम खाऊच्या पानात हमखास आढळणारा म्हणून पूर्वी पानपट्टीवरच दिसणारा पदार्थ होता. मात्र, आता घरगुती मसाल्यांमध्ये पदार्थाची चव आणखी रुचकर होण्यासाठी लखनौवी लहान बडीशेपला मोठी मागणी आहे. त्याचबरोबर पानात घालण्यासाठी साध्या बडीशेपला पानपट्टीधारकांकडून मागणी आहे. - आय. आर. तांबोळी, बडीशेप विक्रेताबडीशेप १०० ग्रॅममध्ये ऊर्जा - १३० केसीएलकर्बोदके - ७.२९ ग्रॅमतंतुमय घटक - ३.१ ग्रॅमचरबी - ०.२० ग्रॅमप्रथिने - १.२४ ग्रॅमजीवनसत्त्वे - ०.२०५ मिलिग्रॅमलोह - ०७३. मिलिग्रॅममॅग्नेशियम - १७ मिलिग्रॅममॅँगनीज - ०.१९१ मिलीग्रॅमफॉस्फरस - ५० मिलिग्रॅमपोटॅशियम - ४१४ मिलिग्रॅमझिंक - ०.२० मिलिग्रॅमबडीशेपचे औषधी उपयोगबडीशेपमध्ये एनिथॉल नावाचा घटक असतो, ज्यामुळे तिला औषधी स्वरूप प्राप्त झाले आहे. मानव व प्राण्यांच्या शरीरात गॅसवातचा त्रास झाला तर बडीशेप गुणकारी मानली जाते. ग्राईप वॉटर, खोकल्याची आयुर्वेदिक औषधे यांच्यात बडीशेप हमखास असते; तर उत्तम दृष्टीसाठी बडीशेपच्या मुळाचा वापर करून काढण्यात आलेला काढा वापरला जातो. रक्तदाबावरही औषधी म्हणून बडीशेपचा वापर औषधी कंपन्या आपल्या उत्पादनात करतात. तसेच माश्या व कीटकांच्या नियंत्रणासाठीही बडीशेपचा वापर केला जातो.