शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळ निश्चितीवरून सरकारकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:03 IST

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान ...

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. घटलेले उत्पन्न हा दुष्काळाचा निकष ठरवून तालुक्याऐवजी गाव हा परिमाण मानून गावातच पीक कापणी प्रयोग घेऊन दुष्काळ निश्चिती करावी, अशी मागणीही डॉ. नवले यांनी केली.दुष्काळाचे जटिल निकष, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव या मागणीसाठी किसान पूर्ण ताकदीनिशी जिल्हा, राज्य व केंद्रीय अशा तीन पातळीवर आंदोलन करणार आहे, अशी घोषणाही डॉ. नवले यांनी केली.अखिल भारतीय किसान सभेतर्फे कोल्हापुरात दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेनंतर डॉ. नवले यांनी पत्रकार बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने येथून पुढे बाजार समित्यांना किसान सभा टार्गेट करणार आहे. बाजार समितीत शिरून शेतमाल विक्री केंद्रे सुरू करण्यास भाग पाडले जाणार आहे. जर यात हयगय झाली तर सहकार व पणन कायद्यानुसार कारवाईसाठी आग्रहही धरला जाणार आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.मुख्यमंत्री नापासमोठा गाजावाजा आणि प्रसिद्धी करत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली पण दुष्काळात साठे कोरडे पडल्याने मुख्यमंत्री त्यात नापास झाल्याचेच दिसत आहे.‘जलयुक्त शिवार’च्या जाहिराती करणाºया मुख्यमंत्र्यांनी अक्षम्य पाप केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकरी संघटनांमध्ये मुख्यमंत्री भांडणे लावताहेत३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.असे असणार आंदोलन२ नोव्हेंबर : जिल्हा पातळीवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने : १५ नोव्हेंबर : मुंबईत राज्यव्यापी शेतकरी परिषद, भाजपवगळता सर्व पक्षांना निमंत्रण : २८,२९, ३० नोव्हेंबर : देशभरातील १८० संघटनांचा दिल्लीत लाँगमार्च, संसदेला घेराओ