शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा घोळ, प्रवाशांचे हाल

By admin | Updated: July 24, 2014 00:08 IST

एस. टी., महापालिका, आरटीओचे दुर्लक्ष : ऐन पावसाळ्यात प्रवाशांना ताप

कोल्हापूर : संततधार पाऊस... नाकाला रुमाल लावायला भाग पाडणारी दुर्गंधी... अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य... अशा परिस्थितीमध्ये शेकडो प्रवाशांना दररोज एस. टी. बसची वाट पाहावी लागते. हे चित्र कुठल्या ग्रामीण भागातील नसून, शहरातील गजबजलेल्या टाउन हॉल बसथांब्यानजीकचे. निवारा नसलेला हा बसथांबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सी.पी.आर. चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने ‘आरटीओ’ने टाउन हॉल येथील एस.टी. बसथांबा हलविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार येथील थांबा काही दिवसांपूर्वी हलविण्यात आला. तो शंभर फुटांवर नेण्यात आला. याठिकाणी पिक-अड शेड बांधण्यासाठी एस. टी.ने महापालिकेकडे परवानगी मागितली; परंतु महापालिकेने याला नकार दिल्याने या ठिकाणी पिक-अप शेड उभे राहिलेच नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पन्हाळा, जोतिबा, मलकापूर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पावसाचा मारा सोसत व शेजारील स्वच्छतागृहातील घाणेरडा वास सहन करीत एस.टी.साठी तिष्ठत थांबावे लागत आहे. यामध्ये नोकरदार, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शेतकरी अशा प्रवाशांचा समावेश आहे. अलीकडे दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने छत्र्या घेऊन निवाराविना प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्याही उडून जाव्यात, अशी स्थिती आहे. ‘आरटीओ,’ ‘महापालिका’ व ‘एस.टी.’ यांच्या त्रांगड्यात दररोज शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी जागेची व्यवस्था करा, अन्यथा पूर्ववत पिक-अप शेड थांबा हलवू, असा इशारा ‘एस.टी.’ प्रशासनाने ‘आरटीओ’ कार्यालयाला पत्राद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)-निवारा नसलेला एस.टी बसथांबा-टाउन हॉल येथील एस.टी. बस थांबा हलविल्याने प्रवाशांचे हाल-आरटीओ, महापालिका, एस.टी. यांच्या त्रांगड्याने सोसावा लागतोय त्रास