शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेच्या युवकाचा गर्दीत गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 00:45 IST

पोर्ले तर्फ ठाणेत यात्रेत मिरवणुकीवेळी प्रकार

पोर्ले तर्फ ठाणे/ मिरज : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईदेवीच्या यात्रेत निघालेल्या बैलगाडा मिरवणुकीवेळी झालेल्या गर्दीत युवकाचा गुदमरून मृत्यू झाला. जयराज सुनील साळोखे (वय १७, रा. मिरज) असे त्याचे नाव आहे. संबंधित घटनेची नोंद कोल्हापुरातील सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुढीपाडव्याला प्रत्येक वर्षी पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईदेवीची यात्रा भरते. मिरजेतील पाटील हौद तालीम परिसरात राहणारा जयराज साळोखे हा येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. आसुर्ले-पोर्ले हे त्याचे आजोळ आहे. मंगळवारी यात्रा असल्याने मावसभावासह आणखी एका मित्राला घेऊन तो दुपारी तीनच्या दरम्यान आसुर्ले-पोर्लेला गेला होता.मित्रांना घेऊन जयराज बैलगाडा मिरवणूक बघण्यासाठी सायंकाळी मामाच्या घरातून गेला होता. यात्रेत गाडे बघण्यासाठी यावर्षी मोठी गर्दी झाली होती. यात्रेत डीजीचा ताल व त्यावर नाचणाऱ्या नृत्यांगणा पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत जयराज व मित्र तल्लीन असताना मित्राची ताटातूट झाली. गर्दीच्या हेलकाव्यात जयरामचा पाय घसरला आणि तो गर्दीत तुडवला गेला. मित्रांनी त्याची शोधाशोध करून मामाच्या घरी त्याची वाट पाहू लागले. चेंगराचेंगरीत दम घुटलेल्या जयरामला काही लोकांनी उचलून घरात नेले. त्याच्याकडून वडिलांचा फोन नंबर विचारून फोन केल्यानंतरच जयरामच्या मामाला ठावठिकाणा समजला. जयरामने वडिलांचा फोन नंबर सांगून जीव सोडला. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मामाच्या गावाला यात्रा पाहण्यासाठी आलेल्या जयरामचा यात्रेतील मिरवणुकीच्या गर्दीत गुदमरून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण आहे. जयरामच्या घरची स्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. (वार्ताहर)