शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

मिरजेत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज गायब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 01:01 IST

पीडिता आत्महत्या प्रकरण : खंडणीच्या गुन्ह्यातील सूत्रधाराबाबत गूढ

मिरज : मिरजेतील बलात्कार पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या कृतीबद्दल वाद सुरू असताना गांधी चौक पोलिस ठाण्यातील दि. ६ आॅगस्टचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब होण्यामागे वरिष्ठांचा हात असल्याच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.बलात्काराची फिर्याद देणाऱ्या तरुणीवर संशयित अमित कुरणेच्या आईने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर गांधी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. अन्य सहाजणांची अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून चौकशी सुरू आहे. दि. ६ रोजी दुपारी पीडितेविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील तीन व गांधी चौक पोलिस ठाण्यातील एक अशा चौघांनी मध्यस्थी करून खंडणीची फिर्याद घेतली व गुन्हा दाखल केल्याची तक्रार आहे. गांधी चौक पोलिस ठाण्यात चार सीसीटीव्ही असून, या सीसीटीव्हीत दि. ६ आॅगस्टचा संपूर्ण घटनाक्रम चित्रित झाला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी गांधी चौक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर वरिष्ठांच्या कार्यालयात नेण्यात आला. त्यानंतर संबंधित चित्रण गायब झाल्याची तक्रार अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. पीडितेच्या नातेवाइकांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणाचा सहभाग होता, याच्या चौकशीची मागणी केल्याने, या खंडणी प्रकरणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याबाबत पोलिस अधिकारी परस्परांकडे बोट दाखवित आहेत. सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली असून खंडणी प्रकरणात नेमका सूत्रधार कोण, याबाबत संशय निर्माण झाला आहे. (वार्ताहर)