शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत संगीत विद्यालय; चांदोलीला संग्रहालय--पर्यटन दिन विशेष

By admin | Updated: September 27, 2014 00:12 IST

पर्यटन वाढीला मिळणार चालना : जिल्ह्याचा ४२३ कोटींचा पर्यटन आराखडा तयार

नरेंद्र रानडे - सांगली जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असली तरी नियोजनाच्या अभावामुळे त्याकडे पर्यटक फारसे फिरकत नसल्याचे चित्र आहे. आता पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एम.टी.डी.सी.) पुढाकार घेतला आहे. पर्यटनस्थळांजवळ अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एम.टी.डी.सी.ने ४२३ कोटी रुपयांचा जिल्हा पर्यटन आराखडा तयार केला आहे. टप्प्या-टप्प्याने त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.प्रशासनातर्फे जिल्ह्यात ४१ प्रमुख पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. सर्वच पर्यटनस्थळांना विशेष महत्त्व आहे. असे असले तरीही, त्यांच्याकडे म्हणावा तसा पर्यटकांचा ओढा नाही. पर्यटकांना संबंधित पर्यटनस्थळी अत्यावश्यक सोयी मिळाव्यात, अशी अपेक्षा असते. परंतु जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्तेही सुस्थितीत नसल्याने पर्यटन वाढीवर विपरीत परिणाम होतो. जिल्हा प्रशासनातर्फे पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली जाते. परंतु त्यात सातत्य नाही.आता पर्यटन वाढीला चालना मिळण्यासाठी एम.टी.डी.सी.ने जिल्हा पर्यटन आराखडा तयार केला आहे. त्यामुळे विविध पर्यटनस्थळे अद्ययावत करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यासाठी ३१ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. याअंतर्गत वन्यजीव संग्रहालय, वॉच टॉवर्स, चांदोली तलावाचे आधुनिकीकरण, पार्किंग सुविधा, निवासासाठी तंबू आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मिरजेत संगीत विद्यालय, संग्रहालय, संगीत ग्रंथालय आदींसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. दंडोबा डोंगरावर रॉक क्लायंबिंग, हॉर्स रायडिंगची सोय करण्याचा मानस आहे. सांगलीत एम.टी.डी.सी.चे अधिकृत निवासस्थान करण्याचे प्रस्तावित आहे.जिल्ह्यात अनेक चांगली पर्यटनस्थळे आहेत. नागरिकांनी ती पाहण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासनदेखील प्रयत्नशील असून भविष्यकाळात पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार आहे. - संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली. सांगलीतील पर्यटनस्थळांना परजिल्ह्यातील पर्यटकांनी भेट देणे आवश्यक आहे. सांगलीबाहेर राहणाऱ्यांनी येथील माहिती देऊन सांगलीत येण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. संस्थेच्यावतीने आम्ही वर्षाला पाच हजार पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी प्रयत्न आहे.- साईराज पाटील, सरचिटणीस, आम्ही सांगलीकर संस्था, मुंबई. जिल्हा विपुल साधनसंपत्तीने नटलेला आहे. परंतु येथील पर्यटनस्थळांची योग्य प्रसिध्दी होत नाही. परिणामी पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा कमी आहे. एम.टी.डी.सी.ने तयार केलेल्या पर्यटन आराखड्यानुसार कार्यवाही सुरू केल्यास जिल्ह्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकेल.- प्रदीप सुतार, व्याघ्र कक्ष समिती.चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, चांदोली धरण, बहे येथील रामलिंग बेट, आरेवाडीचे बिरोबा मंदिर, सागरेश्वर अभयारण्य, सांगलीचे गणपती मंदिर, दंडोबा डोंगर, शुकाचार्य, चौरंगीनाथ, रेवणसिद्ध.