शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस चोप

By admin | Updated: November 1, 2014 00:42 IST

इचलकरंजीतील घटना : नागरिकांतून संताप व्यक्त

इचलकरंजी : येथील घोडकेनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच संशयित आरोपीला नागरिकांनी बेदम चोप देत त्याचे मुंडण केले व शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. सादिक इमामहुसेन लाडेखान (वय ३५, रा. घोडकेनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित सादिक हा विवाहित आहे. दुसऱ्या पत्नीबरोबर तो घोडकेनगरमध्ये राहतो. त्याचे संत मळ्यामध्येही भाड्याचे घर आहे. या घराशेजारी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला त्याने ‘माझी बायको माहेरी गेली आहे, त्यामुळे तू आमच्या घोडकेनगरमधील घरी भांडी घासण्यासाठी ये’, असे सांगून सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडित मुलगी त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने घराच्या दाराला आतून कडी लावली आणि ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.दरम्यान, या प्रकाराचा संशय परिसरातील तरुणांना आला होता. मुलगी घरातून बाहेर आल्यानंतर तिला अडवून विचारले असता, तिने घडला प्रकार सांगितला. संतप्त जमावाने सादिक याला चोप दिला. या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सादिक याला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलगी, तिचे वडील व भाऊ यांना बोलावून घेऊन तक्रार दाखल करून घेतली.