शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाच्या स्पर्धेत मिणचेकर, नाईक, खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:00 IST

कोल्हापूर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून मंत्रिमंडळ विस्तारीकरणास परवानगीच न दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. या संभाव्य विस्तारात ...

कोल्हापूर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून मंत्रिमंडळ विस्तारीकरणास परवानगीच न दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. या संभाव्य विस्तारात शिवसेनेकडून हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना आरोग्यमंत्री म्हणून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपकडून ज्येष्ठ आमदार शिवाजीराव नाईक व सुरेश खाडे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.गेले काही दिवस राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे; त्यामुळे त्याचे काय झाले यासंबंधीची माहिती सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांकडून घेतली असता, जोपर्यंत भाजपचे केंद्रीय नेतृत्व यादीला परवानगी देत नाही, तोपर्यंत हा विस्तार होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक यश शिवसेनेला दिले; त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून जिल्'ाला पहिल्या टप्प्यातच संधी मिळायला हवी होती; परंतु आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच राहिली. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत या दोघांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले नाही, अशा तक्रारी झाल्याने त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह लागले. गेल्याच आठवड्यात आमदार क्षीरसागर यांनी आपल्याला मंत्रिपद नको, अशी जाहीर भूमिका घेतली, याचा अर्थ त्यांना ते मिळणार नाही, हे स्पष्टच होते.आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याबद्दल पक्ष व सरकारच्या पातळीवरही कमालीच्या तक्रारी आहेत; त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाणार आहे. तिथे डॉक्टर असलेल्या आमदार मिणचेकर यांना संधी मिळू शकते. मिणचेकर हे मृदू स्वभावाचे आहेत; त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले, तरी अन्य कोणी दुखावले जाणार नाही. मागासवर्गीय समाजातील असल्याने तीदेखील त्यांची जमेची बाजू आहे.भाजपकडून नाईक की खाडे असा विचार पक्षाकडून सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे मंत्रिमंडळातील दोन नंबरचे वजनदार मंत्री कोल्हापुरात असल्याने आमदार सुरेश हाळवणकर यांना संधी मिळण्याची शक्यता नाही. नाईक व खाडे हे दोघेही मंत्रिपदासाठी सक्षम व पात्र आहेत. खाडे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत. नाईक यांची मात्र ही भाजपकडून पहिलीच टर्म आहे; परंतु ग्रामविकासातील अत्यंत अभ्यासू आमदार, अशी त्यांची प्रतिमा आहे.