कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत. शिवाजी पेेठेतील गांधी मैदान येथील मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदानाचे सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या गांधी मैदान येथील टर्फ मैदानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ८ वाजता प्रभाग क्रमांक ३१ बाजार गेटअंतर्गत जोशी गल्ली चौक, शनिवार पेठ आणि जुना बुधवार तालीम येथे सभा होणार आहेत. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले आदींची उपस्थिती राहणार आहे.