शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

हळदीतून लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:11 IST

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा श्रीरंग पवार यांनी साठ गुंठे क्षेत्रात अवघ्या दहा महिन्यांत ...

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा श्रीरंग पवार यांनी साठ गुंठे क्षेत्रात अवघ्या दहा महिन्यांत हळदीचे उत्पादन खर्च वजा करून सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांनी केलेल्या शेतीतील क्रांतीमुळे पिकाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.अलीकडच्या काही वर्षांत हळदीला पिवळे सोने म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कारण दरही चांगला भेटत आहे. पवार हे गेल्या दहा वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी साठ गुंठे क्षेत्रावर ७७ क्विंटल उत्पादन काढले असून, २० ते २५ क्विंटल बियाण्यांसाठी ठेवले आहे. हळदीच्या पिकात त्यांनी अंतर्गत मका हे पीक घेतले होते. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला.हळदीपूर्व जमिनीची मशागत करताना चारवेळा नांगरट, फनपाळी करून त्यात बारा ट्रॉली शेणखत घातले. चार फुटी सरी सोडून मशीनने हळद पिकाची लागण केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापरही केला. त्यामुळे पाण्याचा समतोल साधता आला. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी औषधाच्या फवारण्याही केल्या. दर तीन महिन्यानंतर बालभरणी केली. तणासाठी वेळोवेळी त्यांनी भांगलण केली.हळदीची लागण दि. १० एप्रिल २०१९ ला केली तर काढणी दि. १५ जानेवारीला केली. बॉयरलमध्ये हळद उकडून त्याला पॉलीश करून विक्रीसाठी मार्केटला दिली. एका क्विंटलला दहा हजार त्यांना मिळाले आहेत. उत्पादन खर्च वजा करता त्यांनी साठ गुंठे क्षेत्रावरील लागवडीतून सहा लाखांची कमाई केली आहे.हळद पिकामधून अनेक फायदेकमी अवधीत जादा उत्पादन देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी हळद पिकाचा वापर आपल्या शेतीत करू लागलेले आहेत. हळदी पिकात मका, फुले अशी अंतर्गत पिकेही घेता येतात. काही ठिकाणी शेतकरी हळद पीक काढण्याची काही महिने अगोदर त्यामध्ये आंतरपीक म्हणून उसाची लागण करून डबल उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हळदीचा बिवड इतर पिकास चांगला असल्यामुळे शेतकरी हळद पीक लागणीकडे वळू लागला आहे.गेल्या दहा वर्षांपासून मी ऊस पिकाबरोबर हळदीचे पीक घेत आहे. हळदीला अपवादानेच एखाद्या वेळेस दर कमी मिळत आहे. अनेकवेळा चांगला दर मिळत असल्याने आमच्या कुटुंबात सधनता आली आहे. यावर्षी साठ गुंठ्यात खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळाले आहेत.- बाळासोा पवार, हळद उत्पादक शेतकरी, वडोली निळेश्वर.वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा पवार यांनी हळदीचे पीक घेतले. त्यांना पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे.