शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उमळवाडच्या ‘मळीच्या पेरू’ची चवच न्यारी

By admin | Updated: April 17, 2017 01:04 IST

शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाला चांगला हमीभाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत पेरूसाठी अग्रेसर गाव

संतोष बामणे ल्ल उदगावअनेक ठिकाणी गोड, तुरट, चवदार व गुलाबी पेरू आपल्याला खायला मिळतात. मात्र, शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठावर वसलेल्या उमळवाड गावचा मळीचा पेरू म्हणून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. उमळवाड गावात सुमारे सध्या ४० टक्के शेतीमध्ये पेरूचे उत्पादन घेतले जाते. तसेच उमळवाडचा पेरू हा चवदार असल्याने या पेरूला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आजही पेरू उत्पादनात अग्रेसर टिकून राहिली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनच्या पलीकडे दोन किलोमीटर अंतरावर कोथळी मार्गावर उमळवाड हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात निम्मी जमीन माळभाग व निम्मी जमीन काळ्या शेताची असून, बारमाही वाहणाऱ्या कृष्णेच्या पाण्यामुळे सर्व शेती बागायत झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांंची मुख्य शेती ही पेरू असून याबरोबर भाजीपाला, ऊस आदी उत्पादन या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उमळवाड येथे १९३२ साली पाटील कुटुंबांनी देशी पेरूची १ एकर मळी भागात बाग केली होती. त्यानंतर उमळवाडच्या कृष्णाकाठावर सर्वत्र पेरूच्या बागा होत गेल्या. त्यानंतर काळ्या रानात व निचरा होणाऱ्या जमिनीतही पेरूच्या बागा अवतरल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पेरूचे उत्पादन करणारे गाव म्हणून उमळवाड गावची ख्याती निर्माण झाली असून ती आजही कायम आहे. त्याचबरोबर उमळवाडच्या कृष्णा नदीपलीकडे सांगली जिल्हा असल्याने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, सांगली, मिरज, विटा, तासगाव या परिसरात येथील पेरू विक्रीसाठी जातात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याबरोबर सांगली जिल्ह्यातही उमळवाडच्या पेरूची चव अंगाशी लागली आहे. सध्या उमळवाड गावात साठहून अधिक पेरूच्या बागा आहेत. यामध्ये जी-विलास, अहमदाबाद सफेद, लखनौ दरदार, ललित गुलाबी व देशी अशा पेरूच्या जाती असून, प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या प्रतीप्रमाणे रोपांची लागण करून बाग फुलवितो, तर कलमी रोपे अगदी चौथ्या महिन्यापासून पेरू द्यायला सुरू करतो. त्यामुळे देशी पेरूपेक्षा सध्या उमळवाड गावात कलमी पेरूंच्या पन्नासहून अधिक बागा आहेत.येथील बागेतील पेरू पहाटे सहा ते आठ या दरम्यान तोडले जातात व डाग भरून नऊच्या रेल्वेने कोल्हापूरकडे रवाना होतात, तर इचलकरंजी, सांगली, मिरज, जयसिंगपूर यासह व्यापारी येऊन पेरू खरेदी करतात. किरकोळ व्यापारी उदगाव, शिरोळ, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर या परिसरात विक्रीसाठी जातात. बागेत एक पेरू सुमारे अर्धा किलोपेक्षाही मोठा व आकर्षक असतो. त्याची चव गोड असल्याने हा पेरू खाल्याने तो परत खाल्याशिवाय मन शांत बसवत नाही. म्हणूनच ‘उमळवाडच्या पेरूची चवच न्यारी’ अशी म्हणच म्हटली जाते. सध्याच्या तंत्रज्ञानानुसार पेरूची बाग करताना एक सरी आडसरीमध्ये दोन बाय सहाच्या अंतराने खोलवर खड्डे काढले जातात. यामध्ये पेरूची रोपे लावली जातात. त्यानंतर शेणखत यासह विविध आळवण्या सुव्यवस्थितपणे करून पेरूची बाग वाढविण्यासाठी शेतकरी झटत असतो. कलमी झाडाचे अवघ्या सहाव्या महिन्यांतच पेरूउत्पादन मिळायला सुरू होते, तर वीस महिन्यांपर्यंत पेरू बागेत आंतरपीक घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरू बागेबरोबर आंतरपिकाचा दुहेरी फायदा मिळतो.उमळवाड हे गाव कृष्णाकाठावर असल्याने शेतकऱ्यांना बारमाही पाण्याची सोय उपलब्ध आहे, तर येथील शेतात देशी पेरूच्या बागाही काही प्रमाणात आहेत. मात्र, देशी पेरूला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे शेतकरी कलमी पेरूच्या पिकाकडे वळला असून कलमी पेरूची बाग ठिबक सिंचनाद्वारे योग्य व्यवस्थापनानुसार अगदी कमी प्रमाणाच्या पाण्यातही चांगली बाग फुलते.सध्याच्या धावत्या युगात जलद गतीचे पीक घेण्यासाठी उमळवाड परिसरातील अनेक शेतकरी आपल्या पेरूच्या बागा काढून भाजीपाल्याकडे वळले आहेत. मात्र, शंभर वर्षांहून अधिक पेरू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे घराणे आजही पेरू उत्पादनच घेत आहेत, हे उमळवाड गावचे विशेष आहे.पेरूचा भारउमळवाड परिसरात सध्या मळी भागात पेरूचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे पाणी निचरा होणाऱ्या जमिनीत सध्या पेरूच्या बागा आहेत. यामध्ये जादा उन्हाने फुले गळून पडतात. त्यामुळे फळधारणा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. तसेच पावसाळ्यात पोषक वातावरणामुळे पेरूचे उत्पादन भरघोस येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात फायदा होतो.असा मिळतो फायदाउमळवाड येथील दीपक पाटील यांच्या शेतात सुमारे २० गुंठे क्षेत्रात जी-विलास या जातीची पेरूची बाग आहे. यामध्ये वर्षातून दोनदा पेरूचा भार येतो. गतवर्षी पाटील यांना दोन्ही हंगामात खर्च वगळता सुमारे अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्यामुळे कमी त्रास, जादा उत्पन्न अशा या पेरू पिकाला चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळतो.दरात चढ-उतारसध्या पेरूचा आकार मोठा असल्याने काही व्यापारी शेकड्यावर पेरू खरेदी करतात. यामध्ये पेरूच्या आकारानुसार दर ठरविला जातो, तर सरासरी पाचशे रुपये ते एक हजारापर्यंत शेकडा पेरूला दर मिळतो. किलोवर तीस ते पन्नास असा सरासरी दर मिळत असून उन्हाळ्यात कमी उत्पादनामुळे चांगला भाव व पावसाळ्यात जादा उत्पादनामुळे कमी भाव मिळतो.हजारो शेतकऱ्यांचा सर्व्हेकोल्हापूर जिल्ह्यातील पेरू उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे उमळवाड गावात बेळगाव, सांगली, सातारा, सोलापूर यासह परिसरातील हजारो शेतकरी भेट देऊन कोणत्या प्रतीची व कोणत्या शेतात पेरूची बाग निर्माण करावी याचा अभ्यास करत असतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील टाकळी, एरंडोली, आटपाडी, खरसुंडी यासह परिसरात सध्या पेरूच्या बागा तयार होत आहेत.दर्जेदार पेरूउमळवाडमध्ये जादा पेरूच्या बागा कलमी झाडांच्या आहेत, तर काही प्रमाणात देशी झाडांच्या आहेत. मात्र, कलमी पेरू आकर्षक व अर्धा किलो वजनापर्यंतचा एक असल्यामुळे नागरिक या पेरूकडे आकर्षिले जातात. त्याची चवही तितकीच गोडवा देणारी असल्यामुळे कलमी पेरू दर्जेदार आहेत, तर वयस्कर मंडळींचा मात्र उमळवाडच्या देशी पेरूकडे कल आहे.दृष्टिक्षेपात उमळवाडलोकसंख्या - ५०२४ महिला - २४२४, पुरुष - २६००ग्रामदैवत - श्री दानलिंग एकूण क्षेत्र - ५०६ हेक्टर (बागायत - ४५४, जिरायत- ५२) व्यवसाय - शेती, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, पेरू उत्पादन दूध संस्था - ९ प्रतिनिधी दूध संकलन - ३२०० लिटर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच साक्षरतेचे प्रमाण - ९० टक्के ४लगतची गावे - उदगाव, जयसिंगपूर, कोथळी, दानोळी. विकासाचा स्रोत - उदगाव औद्योगिक वसाहत शासकीय नोकरदारांची संख्या - तलाठी १, पोलिस २, आर्मी ३, शिक्षक ९, आरोग्यसेवक २, बँक १२, पशुवैद्यकीय १.