शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

दूध उत्पादन घटले; शेतकरी अडचणीत

By admin | Updated: September 3, 2015 23:53 IST

पशुखाद्याचे दर गगनाला : जनावरे विकण्याची वेळ

संतोष बामणे - जयसिंगपूर  बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम बनला आहे. मुख्य पीक उसासह इतर सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारा येथील शेतकरी पशुधनातही आघाडीवर. मात्र, गेल्या आठवड्यापासून पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दुधाचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांना पशुधन विकण्याची वेळ येत आहे. तालुक्याला कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या चारही नद्यांनी वेढा दिल्याने शेती ओलिताखाली आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन अन् कष्टाची तयारी यातून येथील शेतकरी काळ्या आईच्या पोटातून सोने पिकवत आहे. मुख्य पीक उसाबरोबरच भाजीपाला, फळभाजी, द्राक्ष आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे. आदर्शवत शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनातून दुग्ध व्यवसायातही आघाडीवर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याचे वाढलेले दर आणि पशुखाद्याचे दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ध्या चाराटंचाईबरोबर पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. पन्नास किलो पोत्याचे सरकी पेंडचे ११८०, हरभरा कना ८७०, मकाचुनी८००, गोदण मिक्स ८५०, गहू भुसा ८५०, गोळी पेंड साठ किलोला १२००, कडबाकुट्टी ४०० रुपये असे दर वाढल्याने दुभत्या जनावरांना खाद्य द्यायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. खाद्य दिले नसल्यामुळे दुधाचे उत्पादन घटत आहे. दुग्ध व्यवसायातून बेरजेचे गणित मांडणाऱ्या शेतकऱ्यांचे महागड्या चारा व पुशखाद्यामुळे गणितच चुकले आहे. चाऱ्याचे दरही वाढलेसध्या पशुखाद्याचे वाढते दर, वैरण टंचाई व जनावरांच्या औषधाचा खर्च याचा हिशेब केला तर शेतकऱ्याला जनावरे परवडत नाहीत. दुधाला हमीभाव नसल्यामुळे दूध उत्पादकांच्या पदरात काहीच पडत नाही. यामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.- सुशांत मिरजे, दूध उत्पादक, चिंचवाड शेतकरी जनावरे कमी करत असल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने दुभत्या जनावरांना खाद्य द्यावयाचे कमी केल्याने दुधामध्ये घट आली असून व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे.- भूषण मगदूम,दूध व्यावसायिक, उदगांव