शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातून ‘मायक्रो फायनान्स’ गाशा गुंडाळणार

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

ठेवीदारांचे धाबे दणाणले : शाखा व्यवस्थापक ताब्यात

आजरा : आजरा तालुक्यातील दोन हजार ठेवीदारांच्या सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवींना चुना लावून भुवनेश्वर-ओरिसा येथील मायक्रो फायनान्स कंपनी आजरा तालुक्यातून बोजा गुंडाळण्याच्या स्थितीत असून, आजरा येथील शाखा व्यवस्थापक त्रिलोचन इथिली याला सोलापूर पोलिसांनी सोलापुरातील ठेवीदारांना पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याने आजरा शाखेतील ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. सुमारे १५ वर्षांपासून आजरा येथे मायक्रो फायनान्स या ओरिसा येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. व्यवस्थापक वगळता सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट हे स्थानिक आहेत. जुलै महिन्यात या कंपनीस रिझर्व्ह बँकेने ठेवी गोळा करण्यास बंदी घातली. याची ठेवीदारांना फारशी कल्पना नसल्याने ठेवीदार अनभिज्ञ होते. या बातमीची कुणकुण लागलेल्या ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत आपापल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती. ठेवीदारांनी आजरा बाजारपेठेतील शाखा कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर कार्यालयातील उपस्थित उदय पांडव, सौ. देसाई यांच्याकडून २७ एप्रिलनंतर सर्वांचे पैसे देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)एजंट धारेवरबहुतांशी ठेवीदार एजंटांना दोष देताना दिसत होते. एजंटांनी गोड बोलून भरघोस कमिशनसाठी भरमसाट खाती काढली आहेत. दीर्घ मुदतीच्या ठेवींसह पिग्मी व रिकरिंग ठेवीदार एजंटांना ठेवी परत मिळविण्यासाठी धारेवर धरत आहेत.अनेकजण अडकलेआजरा तालुक्यातील सुमारे दोन हजार ठेवीदारांचे नऊ कोटी रुपये ठेवी स्वरूपात मायक्रोे फायनान्सने जमा केले आहेत. यामध्ये फेरीवाल्यांपासून ते बड्या व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.