शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’चे पाणी नियोजन कोलमडले

By admin | Updated: February 28, 2016 00:25 IST

सात दिवसातच योजना बंद : कवठेमहांकाळ तालुका तहानलेलाच

लखन घोरपडे  देशिंग चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली म्हैसाळ योजना अखेर साखर कारखानदार व शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेतून सुरू झाली, मात्र ही योजना सुरू होऊनही त्यामागची समस्या अजूनही सुटलेली नाही. शनिवार, दि. २० रोजी सुरू झालेली म्हैसाळ योजना सात दिवसांमध्ये तीन दिवस बंद राहिली आहे. त्यामुळे योजनेच्या पाणी वाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या योजनेचे पाणी मळणगावपासून (ता. कवठेमहांकाळ) पुढे गेले आहे. मात्र पाणी सुरू झाल्यापासून तीन दिवस योजना बंद राहिल्याने पुढील गावांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी नरवाड, आरग, बेडग, सलगरे यामार्गे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये दाखल झाले. मात्र गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या योजनेच्या पाण्यापासून तालुक्यातील एकही तलाव अथवा नाला भरला नाही. पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन नसल्याने सतत आवर्तन बंद होत आहे. त्यात तांत्रिक बिघाडही होत आहे . एकंदरीतच केवळ ४५ दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याला पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत . शनिवार, दि . २० रोजी पाटबंधारे विभागाने ही योजना सुरू केली; मात्र प्रत्येक तालुक्यासाठी पाणी कसे द्यायचे, याचे नियोजन या विभागाने केले नाही. ४५ दिवसांपैकी आठ दिवस चालू-बंद अवस्थेतच निघून गेले. त्यातच काही शेतकरी अग्रणी नदीमध्ये पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत, तर काही भागातून तालुक्यातील तलाव भरून द्या, अशी मागणी होत आहे. परंतु थोड्याच कालावधीसाठी सुटलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न अता उपस्थित होऊ लागला आहे . दरम्यान, म्हैसाळ योजनेपासून निर्माण करण्यात आलेल्या बनेवाडी, डोंगरवाडी उपसा सिंचन योजनांसह पोटकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. त्यातच सध्या पाण्याची अत्यंत गरज असलेल्या जत तालुक्याला पाणी देण्याचा विचारच प्रशासनाने केला नसल्याचे दिसून येते. म्हैसाळ योजनेच्या कालव्याला सलगरेपासून कोंगनोळी, कुकटोळी, सराटी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असून, दररोज लाखो लिटर पाणी फोंड्या माळावर वाया जात आहे .