शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हाडा’चे प्रकल्प कोल्हापुरात राबविणार

By admin | Updated: April 18, 2017 01:21 IST

समरजितसिंह घाटगे : ग्रामीण जनतेसाठीही घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : ‘म्हाडा’च्यावतीने केवळ एकच प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे; मात्र योग्य जागांचा शोध घेऊन गरजूंना हक्काचे घर देण्यासाठी अधिकाधिक गृह प्रकल्प कोल्हापुरात राबविणार असल्याची माहिती पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच घाटगे यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गेली तीन वर्षे ‘म्हाडा’चे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे ‘म्हाडा’च्या जागा विभागात नेमक्या कोठे व कोणत्या अवस्थेत आहेत, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या म्हाळुंगे (पुणे) येथे २८०० फ्लॅटचा मोठा प्रकल्प सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘म्हाडा’ही पुढे असेल. ‘म्हाडा’च्या माध्यमातून आगामी काळात ग्रामीण भागातील जनतेसाठीही घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले. अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या ही खरी अडचण असून, बाहेरून कर्मचारी घेता येतील का? याची चाचपणीही सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन प्रकल्पाबरोबरच प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन घाटगे यांचे स्वागत केले. दर्जेदारपणास प्राधान्य!‘म्हाडा’च्या बांधकामाविषयी काही तक्रारी आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आगामी काळात त्या येणार नाहीत. बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे घाटगे यांनी सांगितले.