शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएच-सीईटी’ आज

By admin | Updated: May 5, 2016 00:50 IST

प्रशासनाची तयारी पूर्ण : १४ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

कोल्हापूर : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी-२०१६) आज, गुरुवारी होणार आहे. राज्याच्या सामायिक परीक्षा विभागातर्फे परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर केंद्रावरून १४ हजार २७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे.कोल्हापूर शहरातील ३४ उपकेंद्रांवर गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी साडेचार यावेळेत ही परीक्षा होणार आहे. यातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पहिला पेपर सकाळी दहा ते साडेअकरा यावेळेत होईल. यानंतर दुपारी बारा ते दीड यावेळेत जीवशास्त्राचा आणि दुपारी तीन ते साडेचार यावेळेत गणित विषयाचा पेपर होणार आहे. यंदा पहिल्यांदाच आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे सामायिक प्रवेश परीक्षा होत आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेचे नियोजन केले आहे.अवधूत पाटीलचा कोठडीत अभ्यासकोल्हापूर : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी अवधूत पाटील (वय १९, रा. देऊळवाडी, ता. भुदरगड) याची बुधवारी जामिनावर सुटका झाली. आज, गुरुवारी वैद्यकीय प्रवेशासाठी होणारी ‘सीईटी’ परीक्षा तो देणार आहे. त्यासाठी त्याने पोलिस ठाण्यातील कोठडीत बसून अभ्यास केला आहे. चोरीच्या गुन्ह्याखाली लक्ष्मीपुरी पोलिसांनी अवधूत पाटीलला अटक केली होती. तो अभ्यासात हुशार असल्याने त्याचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली. दरम्यान, राजारामपुरी पोलिस त्याला तपासासाठी फिरवत असताना तो जिन्यावरून तोल जाऊन पडून गंभीर जखमी झाला होता. सीपीआरमध्ये उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला बिंदू चौक येथील कारागृहात ठेवले. तेथून त्याला जामीन मिळाला. पोलिस कोठडीत असताना ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी तो अभ्यास करीत होता. त्यासाठी पोलिसांनी त्याला पुस्तके पुरविली होती. आज, गुरुवारी होणारी ‘सीईटी’ परीक्षा तो देणार आहे. (प्रतिनिधी)एक हजार अधिकारी, कर्मचारीपरीक्षेसाठी महसूल व अन्य विभागांतील सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यांना परीक्षा विषयक कामकाजाचे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशासनातर्फे बुधवारी दुपारनंतर परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक टाकण्याचे काम सुरू होते.