शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

जयसिंगपूर, शिरोळ परिसर : डॉल्बीला फाटा देऊन ढोल-ताशा, झांज, लेझीम, बेंजोचा सहभाग

जयसिंगपूर : ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड परिसरांत २७३ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन डॉल्बीला फाटा देऊन ढोल-ताशा, झांज, लेझीम, बेंजोच्या दणदणाटात करण्यात आले. काही मंडळांनी मूर्तिदान करून नदी प्रदूषण टाळले आहे. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या तिन्ही पोलिस ठाण्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जयसिंगपूर पोलिस ठाण्याअंतर्गत आठ गावांतील ४८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये जयसिंगपूर परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन उदगाव येथील कृष्णा नदीपात्रात करण्यात आले, तर १३ मंडळांनी मूर्तिदान केल्या. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलिस कर्मचारी व १३ होमगार्ड यांच्या साहाय्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये दानोळी, उदगाव, निमशिरगाव, चिपरी, आदी गावांत बंदोबस्त ठेवला होता.शिरोळ पोलिस ठाण्याअंतर्गत ४३ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पंचगंगा, कृष्णा नदीत करण्यात आले. यामध्ये काही मंडळांनी मूर्तिदान केल्या आहेत. तसेच अर्जुनवाड घाट, शिरोळ, नांदणीसह परिसरात मोठ्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शिरोळ पोलिसांकडून डॉल्बीला वापरणारे मिक्सर जप्त करण्यात आले. शिरोळ येथे सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्या साहाय्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरुंदवाड पोलिस ठाण्याअंतर्गत अनंत चतुर्दशीदिवशी १८२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये नृसिंहवाडी, कुरुंदवाड, हेरवाड, दत्तवाड, टाकळी, अब्दुललाट परिसरातील गावांत मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींचे विसर्जन करण्यात आले.कुरुंदवाड पोलिस ठाण्याकडे ४१९ मंडळांची नोंद झाली होती. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.