ऑनलाईन शिक्षण घेताना काही प्रॉब्लेम आल्यानंतर कंटाळा येतो. शाळेत जाऊन शिक्षण घेण्यात खूप चांगले वाटते. घरी असताना आजूबाजूचा दंगा असतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. डोळे दुखतात त्यामुळे लवकर शाळा पुन्हा सुरू व्हावी.
-शर्वरी कोळी, इयत्ता चौथी.
शाळा नसल्याने मित्रांना भेटता येत नाही. कोरोना असल्याने घराबाहेर पडता येत नाही. मैदानात खेळता येत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलची सवय लागली आहे. शाळा सुरू व्हायला पाहिजे.
-प्रज्वल यादव, इयत्ता तिसरी.
प्रवेश घेताना शाळेत गेले होते. त्यानंतर पुन्हा जात आले नाही. आई-बाबांच्या मोबाईलवरच अभ्यास केला. आता दुसरीच्या वर्गात गेले आहे. यावर्षी, तरी शाळा सुरू व्हाव्यात असे वाटते.
-क्षितिजा मुधोळकर, इयत्ता दुसरी.
फोटो (०६०५२०२१-कोल-शर्वरी कोळी (शाळा), प्रज्वल यादव (शाळा), क्षितिजा मुधोळकर (शाळा)