शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

संगणकाच्या अतिवापराने मानसिक आजार

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

मानसी बोडस : इंटरनेटचे दुष्परिणाम टाळा; संगणकाचा गैरउपयोगच जास्त

कोल्हापूर : मानवाने संगणकाच्या मदतीने सर्व विश्व मुठीत घेतले; पण कल्पना करू शकत नाही इतके विश्वातील ज्ञान एका सेकंदात इंटरनेटवरून मिळते. संगणकामुळे वेळेची बचत होत असली, तरी त्याच्या उपयोगापेक्षा गैरउपयोगच जास्त होत आहे. संगणकाच्या अतिवापराने अनेकजण शारीरिक व मानसिक आजाराला बळी पडू लागले आहेत. पालकांनी मुलांना वेळीच इंटरनेच्या दुष्परिणामापासून दूर ठेवावे, असे प्रतिपादन पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मानसी बोडस यांनी केले. सन्मित्र हौसिंग सोसायटीच्या सभागृहात पालक मंच संवेदना शिक्षण प्रसारक मंडळ व राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीच्यावतीने आयोजित ‘इंटरनेट किती दूर? किती जवळ?’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.बोडस म्हणाल्या, ‘दैनंदिन आणि कार्यालयीन कामात नेहमी उपयोगी पडणारा होतकरू मित्र म्हणजे संगणक. इंटरनेटमुळे वेळ, पैसा वाचतो. अचूक माहितीही ‘क्लिक’वर मिळते. त्यामुळेच पालक माझा मुलगा या तंत्रज्ञानाच्या विश्वात मागे राहू नये म्हणून त्याला कॉम्युटर, मोबाईल आणि इंटरनेट या सुविधा उपलब्ध करून देत आहेत, परंतु आपला मुलगा त्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग हे पाहण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. किंबहुना बऱ्याच पालकांना संगणकाचे ज्ञान मुलांपेक्षा कमी असल्याने आणि संगणकाचा तो दुरुपयोग कसा करतो याची त्यांना कल्पनाही नाही. या गोष्टी वेळीच ओळखल्या पाहिजेत. बदल हा निसर्गाचा नियमच आहे; पण आगपेटीतील एका काडीने अंधार नाहीसा होतो, त्याच काडीद्वारे इमारतीलाही आग लावली जाते, हे विसरता कामा नये. विदुला स्वामी यांनी स्वागत केले. जय वडगावे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता माटे यांनी आभार मानले. यावेळी पालकमंच अध्यक्षा सुमेधा कुलकर्णी, प्रज्ञा हेर्लेकर, प्रसाद हेर्लेकर, प्राजक्ता कुलकर्णी, शुभांगी सोहनी, मंजिरी हर्डीकर, संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष एम. पी. कालगावकर, सचिव श्रीकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)