शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा घणाघाती आरोप करीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकर यांचा समाचार घेतला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संपर्क दौºयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक दिनकर पाटील होते. राधानगरीतील पालकरवाडी, कसबा वाळवे, चंद्रे, शेळेवाडी, माजगाव, तळाशी, अर्जुनवाडा, तिटवे या गावांचा सत्तारूढ के. पी. पाटील गटाने संपर्क दौरा केला.पाटील म्हणाले, ज्या कारखान्याचा ऊस दर राज्यात प्रथम क्रमांकावर नेला, आमच्या संचालक मंडळाने सहवीज प्रकल्प यशस्वी करून दाखविला. तो कसा बंद पडेल याचसाठी आटोकाट प्रयत्न करता मग तुम्ही सभासद हिताचे काय निर्णय घेणार? असा सवाल करीत १९९८ साली एक गुंठा जमीन नावावर नसणाºया आबिटकर यांना सभासद केले त्यावेळी आम्ही बरे होतो, मग तुमच्या आज पोटात का दुखते?राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बाजार समितीचे संचालक नेताजीराव पाटील, ‘बिद्री’चे माजी संचालक भिकाजी एकल, पंडित केणे, जि. प. सदस्य जीवन पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, युवराज वारके, मधुआप्पा देसाई, शरद पाटील, शहाजी बरगे, उमेश भोईटे, नानासो पाटील, आप्पासो देसाई, आप्पासो आबदार, अशोकराव फराकटे, सुनील वारके, पंडित पाटील, आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. दिनेश माळे यांनी आभार मानले.सभासद अपात्र करून तुम्ही काय साधले?बिद्री साखर कारखान्याला सभासद करताना आम्ही कधीही गटातटाचा विचार केला नाही, सहवीज प्रकल्प यशस्वी व्हावी हा एकच उद्देश होता. मात्र, आमदार आबिटकर आणि मंडळींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. जो शेतकरी आहे, ऊस पिकवितो, कार्यक्षेत्रातील आहे, त्याला अपात्र करून तुम्ही काय साधले? असा सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. माझे पाहुणे निगवे येथे जमीन कसतात, आमदार मुश्रीफ यांचे चिरंजीव बोरवडे गावचे खातेदार आहेत त्यांचा ऊस ‘बिद्री’ला येतो मग हे कार्यक्षेत्रातले नव्हेत का ? सोशल मीडियावरून दिशाभूल करू नका, या निवडणुकीत उद्या तुम्हीच अपात्र होणार आहात, असे पाटील म्हणताच उपस्थित सभासद शेतकºयांनी दाद दिली.