शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सभासद ‘कुंभी बचाव’ला हद्दपार करतील

By admin | Updated: December 22, 2015 00:51 IST

चंद्रदीप नरके : शिरोली दुमाला येथील सभेत विरोधकांवर टीका

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत नरके पॅनेलने कारखान्यात काटकसरीचा कारभार करत विविध प्रकल्प उभारून उत्पन्नात वाढ केली. सत्तेच्या काळात सभासदांच्या हिताचा पारदर्शक कारभार केला, पण सामाजिक संघटनेचा आव आणून सत्तेसाठी खोटे आरोप करणाऱ्या कुंभी बचाव मंचला सभासद हद्दपार करून नरके पॅनेलला विक्रमी मतांनी विजयी करतील, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ शिरोली दुमाला (ता. करवीर) आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सखाराम पाटील होते. नरके पॅनेलने केलेला आदर्श कारभार पाहून अनेकांनी निवडणुकीत माघार घेऊन सहकार्याची भूमिका घेतली, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून कुंभी बचाव मंचने निवडणूक लावली आहे. त्यामुळे कारखान्याला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. स्वर्गीय डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारभार केल्याने सभासदांचे पाठबळ कायम आहे. आम्ही सत्तेच्या काळात सभासदांच्या हिताचे भरीव कार्य केल्याने केवळ पोकळ आश्वासने देणाऱ्या विरोधकांना सभासदच मोठ्या मताधिक्याने पराभूत करतील, असेही आमदार नरके यांनी सांगितले. कमी वेळेत, कमी खर्चात सहवीज प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ झाली, पण प्रकल्प उभा करताना कुंभी बचावच्या नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रकल्प पूर्ण केला. निवडणूक बिनविरोध करू म्हणणारे बचाव मंच आता निवडणूक कशासाठी लढवत आहे. कारखान्यावरील कर्ज हे कर्ज नसून भांडवली गुंतवणूक आहे. कोणत्याही संस्थेचा विकास कर्ज घेतल्याशिवाय होत नाही. आम्ही आत्मविश्वासाने कर्ज घेतले, भांडवल उभा केले, त्यातून उत्पन्न मिळवून वेळेत कर्जाचे हप्ते परत केले. साखर, उपपदार्थ शिल्लक आहे. शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देत असल्याने विरोधकांचे आरोप तथ्यहीन आहेत. राजकारणातील आरोप-प्रत्यारोप समजू शकतो, एवढे करून बचाव मंच थांबला नाही तर आमच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा बेगडी विरोधकांपासून कारखान्याला खरा धोका असून त्यांना वेळीच रोखून सभासदांनी नरके पॅनेलला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार नरके यांनी केले. आनंदराव पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, भगवान रामा पाटील, सदाशिव खाडे उपस्थित होते. आरळे, चाफोडी, सावरवाडी, गणेशवाडी परिसरात प्रचारदौरा केला.