शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीपासून अलिप्त

By admin | Updated: December 22, 2015 00:50 IST

उमेदवारांकडून पाठलाग : राजू शेट्टी यांच्या आदेशानुसारच निर्णय

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतील चुरशीमुळे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य सहलीवर गेले आहेत. मात्र, अजून तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाच सदस्य आणि एक सभापती सहल आणि विविध आमिषांपासून दूर राहत कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत. सोमवारी ‘स्वाभिमानी’चे सहाजण येथील जिल्हा परिषदेत येऊन नियमित कामकाज पाहिले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार महादेवराव महाडिक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक मतदाराला ‘सोन्याचा भाव’ आला आहे. मतदारांच्या हाता-पाया पडण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. अनेक मतदार ‘टोकन’ घेऊनच सहलीवर गेल्याची चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंब्याचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार ‘स्वाभिमानी’च्या सदस्यांच्या संपर्कात आहेत. सहलीची आॅफर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून ‘स्वाभिमानी’चे सदस्यही जम्मू-काश्मीर, केरळ येथे सहलीला गेल्याची चर्चा जोरात सुरू होती. जाहीरपणे भूमिका न घेता सहलीवर कसे गेले, अशीही विचारणा होत होती.‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, नीता परीट, अनिल मादनाईक, सुनंदा दानोळे, सीमा पाटील, सभापती शीला पाटील सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीला गेले आहेत या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, पाठींब्यासाठी दोन्ही उमेदवार पाठलाग करीत या सहा सदस्यांशी थेट संपर्क साधून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. (प्रतिनिधी)स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा देणार याचा निर्णय अद्याप झालेला नसून तो खासदार राजू शेट्टी घेणार आहेत. ‘स्वाभिमानी’चे कोणीही सहलीवर गेलेले नसून ‘स्वाभिमाना’ने ते आपल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. शेट्टी दिल्लीहून आल्यानंतर निर्णय होईल. मतदानादिवशी स्वतंत्रपणे येवून ते मतदानाचा हक्क बजावतील.- भगवान काटे, जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना