शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सदस्यांच्या स्वनिधीला कात्री

By admin | Updated: March 25, 2017 00:52 IST

जिल्हा परिषद : २९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; स्वनिधी केवळ पाच लाख

कोल्हापूर : लाखो रुपये खर्च करून अटीतटीने निवडून आलेल्या सदस्यांना आगामी आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघासाठी केवळ पाच लाख रुपयांचा स्वनिधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २०१७-१८ चा २९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर केला. गेल्या वर्षी ४२ कोटी रुपयांचा असणारा अर्थसंकल्प यंदा २९ कोटींवर आल्याने सदस्यांनाही तुटपुंजा निधी मिळणार आहे. अर्थसंकल्पाला विभागीय आयुक्तांची मान्यता घेऊन नंतर तो नवीन सभागृहाच्या माहितीसाठी पटलावर ठेवला जाईल. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. खेमनार म्हणाले, गेल्या काही वर्षांत शासनाची येणी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना स्वनिधी म्हणून मोठा निधी देता आला. मात्र, ही येणी संपल्यामुळे अर्थसंकल्प २९ कोटींवर आला आहे. त्यामुळेच प्रत्येक सदस्याला पाच लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. विद्यानिकेतन शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेसाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यातून पटांगणाचे सपाटीकरण होईल. व्याजाचेही ७० लाख रुपये शाळेकडे शिल्लक आहेत. डिजिटल क्लासरूम व ई-लर्निंगसाठी ४९ लाखांची तरतूद केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शाळाखोलीच्या दुरुस्तीसाठी १५ लाखांची तरतूद केली आहे. जि.प. आवार, भाऊसिंगजी रोड, कदमवाडीकडील जागेवर होर्डिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी आठ लाख रु. खर्च करण्यात येतील. ‘पशुसंवर्धन’तर्फे ५० टक्के अनुदानावर मुक्त गोठा पद्धती संचार पद्धतीस प्रोत्साहन देण्यासाठी २० लाखांची, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आयएसओ मानांकनासाठी ३ लाख, ७५ टक्के अनुदानावर विधवा, परित्यक्ता व दारिद्र्यरेषेखालील महिलांना दोन शेळ्या किंवा २० तलंगा वाटप करणे यासाठी १० लाख, जळितग्रस्त एका जनावरासाठी २० हजार रुपये याप्रमाणे पावणेआठ लाख व गावठी, भटक्या कु त्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीन लाखांची तरतूद केली आहे.अपंग कल्याण विभागांतर्गत अपंग व्यक्तींना कर्करोग, क्षयरोग, मेंदू विकास, हृदय शस्त्रक्रिया अशा दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपये आरक्षित आहेत. अपंग व्यक्तींना टपरी पुरविण्यासाठी २५ लाख, अपंग पालक असतील तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. ‘महिला व बालकल्याण’तर्फे मुली, महिलांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण, एमएसआयटी प्रशिक्षण, पिठाची गिरणी, अंगणवाडी साहित्यासाठी एकूण ९६ लाखांची तरतूद केली आहे. पत्रकार परिषदेला प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, ‘बांधकाम’चे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. गावाकडचे विद्यार्थी जाणार आयुका/इस्रो भेटीलाजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून, यातील गुणानुक्रमे ३६ विद्यार्थ्यांना आयुका / इस्रो या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांची भेट घडविली जाणार आहे. त्यासाठी विमानप्रवासासह होणाऱ्या खर्चासाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तरुण मंडळांना क्रीडा, व्यायामसाहित्य पुरविणे बंदएकूणच निधीला मोठी कात्री लागल्याने शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या तरुण मंडळांना ‘क्रीडा, व्यायाम साहित्याचे वाटप’ या योजनेवर निधी धरता आलेला नाही. गेल्या वर्षी या योजनेवर ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र यंदा निधीच निम्म्यावर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागासवर्गीय वस्तीमध्ये ओपन जीमजिल्ह्यातील मोठ्या गावांतील दलित वस्तींमध्ये ओपन जीम उभारण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय मुलींना शाळेत जाण्यासाठी दरवर्षी चार हजार रुपये याप्रमाणे ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे.