शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले ग्रामसभेत सदस्यांची झाडाझडती

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

गैैरव्यवहाराचा मुद्दा चर्चेत : खोट्या सह्या करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याचा ठराव

आळते : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या हातकणंगले ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार करून प्रशासन व लोकप्रतिनिधींना निरुत्तर केले. मागील ग्रामसभेला अनुपस्थित राहून नंतर खोट्या सह्या करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याच्या ठरावासह ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्या बदलीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री अपराज होत्या.हातकणंगले ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने चाललेल्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये अनेक दिवसांपासून संताप खदखदत होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. ही सभा वादळी होण्याचे संकेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला समजल्याने सरपंच जयश्री अपराज यांचा ग्रामसभा गुंडाळण्याचा डाव नागरिकांनी हाणून पाडला. सरपंच अपराज यांनी गणसंख्येअभावी ग्रामसभा तहकूब करीत असल्याचे सांगताच संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करत सह्या घेण्याची मागणी केली. नागरिकांची गर्दी पाहून ग्रामपंचायत सभागृहातील सभा बाजारपेठेतील नेहरू चौकात घेण्यात आली.मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवित असताना ग्रामविकास अधिकारी सिदनाळे यांनी मागील ग्रामसभेला फक्त चार ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असताना सर्वच सदस्य उपस्थित असल्याचे सांगताच आण्णासोा चौगुले यांनी आक्षेप घेत केवळ चारच सदस्य उपस्थित असल्याचे सांगून सदस्यांच्या नंतर खोट्या सह्या घेतल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामविकास अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सभेत एकच गोंधळ उडाला. खोट्या सह्या करून नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकप्रतिनिधींशिवाय अन्य कारभारी मंडळीची लुडबूड चालू असल्याने त्याचा त्रास काही ग्रामपंचायत सदस्यांना व नागरिकांना होत असल्याने कामकाजातील इतरांची ढवळाढवळ बंद करण्याचा ठराव संमत झाला. गावातील सर्वच पाणी कनेक्शन स्टॉप व्हॉल्व्ह बसवावे, घरफाळा व पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा व्हावा, ग्रामसंस्कार वाहिनी दुरुस्त करून त्याचा वापर करावा, बेघर वसाहतीतील घरे भाड्याने देणाऱ्या किंवा विकणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करावी, आदींसह अनेक ठराव मंजूर झाले. (वार्ताहर)'ग्रामस्थांच्या प्रश्नांना सदस्यांचे मौननागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सरपंच, काही सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांची भंबेरी उडाल्याने त्यांना बहुतांश प्रश्नांना उत्तरे देण्यास आली नाहीत. तर काही सदस्यांनी मौन धारण केले होते. हातकणंगले गावच्या इतिहासात प्रथमच वादळी ग्रामसभा होऊन कामकाज चव्हाट्यावर आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले, तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी पारदर्शक कारभार करण्याची मागणी मात्र नागरिकांतून होत आहे.