शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांना १६०० रु.ची ‘ब्रिफकेस’

By admin | Updated: March 26, 2015 00:11 IST

खूश करण्याचा प्रयत्न : वित्त अधिकाऱ्यांकडून विसंगत माहिती

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पाच्या सभेत सदस्यांना तब्बल १६०० रुपयांची ब्रिफकेस भेट देऊन खूश केले. ९० महागडे ब्रिफकेस खरेदी करून परिषदेच्या इतिहासात नवा पायंडा पाडला. त्यामुळे जिल्ह्यात ब्रिफकेस वाटपाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकारी, सदस्य, सभापतींसोबत काही अधिकाऱ्यांनाही ब्रिफकेस भेट मिळणार आहे. ९० ब्रिफकेससाठी १ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, वित्त विभाग ब्रिफकेसच्या संख्येबाबत विसंगत माहिती देत आहेत. मंगळवारी झालेल्या सभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अविनाश सुभेदार, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी नवीन ब्रिफकेस घेऊन येऊन अर्थसंकल्प मांडला. सभा सुरू असतानाच परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सदस्यांना अतिशय काळजीपूर्वक सही घेऊन ब्रिफकेस पोहोच केली. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यात प्रथम आल्याबद्दल शासनाकडून २५ लाखांचे बक्षीस मिळाले आहे. त्यातील पाच टक्के निधीतून ब्रिफकेस घेण्याची तरतूद असल्याचे प्रशासन सांगत आहे. (प्रतिनिधी)बक्षिसांचा विनियोग कसा करावा, यासंबंधी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे स्वतंत्र आदेश काढला आहे. या आदेशात पाच टक्के निधी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च करावा, असे सूचित केले आहे. या नियमानुसार ब्रिफकेस खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. सदस्य आणि सभापतींसाठी जितक्या लागतील तितक्या १६०० रुपयांना एक याप्रमाणे ब्रिफकेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून दिल्या आहेत. - गणेश देशपांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी