शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेघा पानसरे, हमीद दाभोलकर ‘नेक्स्ट टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:11 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये मेघा पानसरे, हमीद व मुक्ता दाभोलकर यांचा ‘नेक्स्ट टार्गेट’ असा उल्लेख आढळल्याने या तिघांनाही स्टेट इंटिलिजन्स विभागाने (एसआयडी) ‘एक्स’ दर्जाचे संरक्षण पुरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत २४ तास स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) विभागाचा ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये मेघा पानसरे, हमीद व मुक्ता दाभोलकर यांचा ‘नेक्स्ट टार्गेट’ असा उल्लेख आढळल्याने या तिघांनाही स्टेट इंटिलिजन्स विभागाने (एसआयडी) ‘एक्स’ दर्जाचे संरक्षण पुरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत २४ तास स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) विभागाचा जवान तैनात करण्यात आला आहे. हे तिघे भारतात कुठेही गेले तर त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी त्यास दुजोरा दिला आहे.मेघा ह्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्नुषा आहेत. तर हमीद व मुक्ता दाभोलकर हे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुले आहेत. दाभोलकर व पानसरे यांचे ते लोकांच्या मनांतील धर्माविषयीच्या भोंदू कल्पनांबाबत जागरुकता करीत असल्याच्या रागातून उजव्या विचारांच्या एका गटाने अत्यंत नियोजनबद्धपणे मॉर्निंग वॉकला गेल्यावर पिस्तुलाने निर्घून खून केले आहेत. याच लोकांनी कर्नाटकातील विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचाही खून केल्याचा संशय आहे. तपासादरम्यान कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे काही डायऱ्या व साहित्य सापडले. त्यामध्ये पानसरे व दाभोलकर बहीण-भावांबद्दल उल्लेख आढळला. त्यानुसार ही माहिती कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाला सुमारे दोन महिन्यांपूर्वी कळविली. महाराष्ट्र शासनाकडून त्याची वेगवेगळ्या पातळीवर कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळल्याने सुरुवातीला राज्य पोलीस दलाचे संरक्षण पुरविण्यात आले. त्यानुसार पानसरे यांच्या निवासस्थानी सहा पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता; परंतु कांही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांचे संरक्षण काढून घेण्यात आले. पुण्यातून ‘एसआयडी’ विभागाचे प्रमुख कृष्णप्रकाश यांचा मेघा पानसरे यांना फोन आला व त्यांनी काळजी घ्यायची गरज असल्याने एसपीयू विभागाचा जवान संरक्षणासाठी तैनात करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार या विभागाचे जवान या तिघांनाही सध्या संरक्षण देत आहेत.कारण काय?पानसरे व दाभोलकर यांच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या तिघांनीच लावून धरला आहे. त्याशिवाय जिथे सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध होईल तिथे हे त्यांच्या विचारांबद्दल, तपासातील दिरंगाईबद्दल वारंवार सरकारचे लक्ष वेधत आहेत. त्यातूनही काही लोक दुखावले गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.