शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’मध्ये मेगा नोकरभरती !

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

काही संचालक ठाम : बरेचसे नेत्यांवर अवलंबून

राजेंद्र पाटील -- भोगावती --येथील भोगावती साखर कारखान्यात विविध कारणांनी गाजत असलेल्या नोकरभरतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नोकरभरती करायचीच यावर काही संचालक ठाम आहेत. त्यामुळे मेगा भरती होणार हे निश्चित आहे.भोगावती कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे सर्वश्रृत आहे. कामगारांना पगार देण्यास कारखान्याकडे पैसा नाही. आठ महिन्यांची सभासद साखर देणे आहेत. अशा परिस्थितीत भरती होत आहे. कारखान्याकडे सध्या ४00 कायम कामगार आहेत. त्यामध्ये आता १0४ कायम कामगारांची भरती केली जाणार आहे. ५0 रोजंदारी कामगार घेतले जाणार असून १५0 पेक्षा जादा कामगारांना निश्चित वेतनावर घेतले जाणार आहे. काही संचालकांनी यापूर्वीच तीन-चार अशा प्रमाणात जागा भरल्या आहेत. आता कार्यकर्त्यांचा तगादा असल्यामुळे जादा जागांची मागणी करू लागले आहेत. यातून नाराजीदेखील उमटू लागली आहे.कारखान्यात पूर्वी काम करत असलेल्या अनेक रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप कायम केले नाही. मात्र नवीन भरतीचा घाट घातला जात आहे. यात इच्छुकांची संख्या पाहता सर्वांचे समाधान या नोकरभरतीत होऊ शकत नाही. तरीही काही संचालक नोकरभरतीवर ठाम आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी या नोकरभरतीला तीव्र विरोध केला आहे. तरीही त्यांच्या आदेशाला संचालकांनी केराची टोपली दाखविली.गेल्या गळीत हंगामात ज्यांनी रोजंदारीवर काम केले त्यांना हजेरीतील दमडीही अद्याप दिलेली नाही. याबाबत संचालक बोलायला तयार नाहीत.भोगावती कारखान्यात कामगार पॅटर्न ९५0 कर्मचाऱ्यांचा आहे. सध्या ३९३ कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या ठिकाणी कामगार नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे पूर्वीपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. - एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, भोगावती कारखाना.सहसंचालकांच्या आदेशाचे काय ?भोगावती साखर कारखान्याच्या प्रस्तावित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपात कोणत्याही संवर्गात कायमस्वरुपी, अंशकालीन अथवा रोजंदारी स्वरूपाची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिला असतानाही नोकरीभरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. साखर सहसंचालकांचा आदेश डावलून केलेली नोकरभरती वैध ठरणार की आदेश डावलल्याने साखर आयुक्त ‘भोगावती’वर कायद्याचा बडगा उगारणार, हा प्रश्न निर्माण झाला असून, नोकरी मिळणार या आशेने पाच वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.