शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अतिवरिष्ठ २५ अधिकारी घेणार जिल्ह्यात बैठका- महाराष्ट्रात अशा पहिल्यांदाच जिल्हास्तरावर बैठकां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:39 IST

तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आखलेल्या योजनांची फलनिष्पत्ती दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुतांश

ठळक मुद्देसहा महिन्यांत योजनांची फलनिष्पत्ती साध्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशबुधवारपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका

समीर देशपांडेकोल्हापूर : तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आखलेल्या योजनांची फलनिष्पत्ती दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुतांश मंत्रालयात कार्यरत असणारे अतिवरिष्ठ २५ अधिकारी आता आज, बुधवारपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांमध्ये जेवढ्या योजना जाहीर केल्या त्यातून नेमके काय साध्य झाले, याची पाहणी करण्यासाठी आता हे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बैठक घेणार आहेत. यामध्ये विविध खात्यांचे अप्पर मुख्य सचिव, सचिव, सदस्य सचिव, प्रधान सचिव, महासंचालक, आयुक्त अशा अतिवरिष्ठ अधिकाºयांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे पहिल्यांदाच जिल्हास्तरावर बैठकांचे आयोजन होत आहे.

यासाठी सहा समित्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्याकडे विविध जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख १0 योजनांचा तीन तासांमध्ये तर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पोलीस ठाणेनिहाय दोन तासांमध्ये आढावा घेणे या अधिकाºयांना बंधनकारक करण्यात आले आहे.

योजनांसाठी त्या-त्या जिल्ह्याने केलेली अतिरिक्त निधीची मागणी, तिची पूर्तता, योजनांशी संबंधित रिक्त जागा भरण्याची कार्यवाही, जलसिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांची सद्य:स्थिती, पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधीची उपलब्धता आणि धोरण, नियमांच्या शिथिलीकरणाबाबतची सद्य:स्थिती याचा आढावा या बैठकांमध्ये घेण्यात येणार आहे.या दहा योजनांचा आढावा बंधनकारकप्रधानमंत्री ग्रामीण, शहरी आवास, जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक विहिरी, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुद्रा, मुख्यमंत्री ग्रामसडक, दलितवस्ती सुधार, बळिराजा, पंतप्रधान कृषिसिंचन योजना आणि प्रत्येक जिल्ह्यातील पाणीपुरवठा, भूमिगत गटार, मलनि:सारण योजनेतील दोन पथदर्शक प्रकल्प याबाबतचा आढावा हे अधिकारी घेणार आहेत.पोलीस ठाणेनिहाय चर्चाजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत दोन तास बैठक घेण्यात येणार असून प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय गुन्हे सिद्धीचे प्रमाण, महिला अत्याचारासंबंधी गुन्ह्यांची संख्या, नोंद झालेले गुन्हे, तपास पूर्ण व अपूर्ण गुन्हे यांचा आढावा घेण्यात येणार आहे.अधिकाºयांची धावपळराज्यपातळीवरील अतिवरिष्ठ अधिकारी जिल्हापातळीवर आढावा घेण्यासाठी येत असल्याने अधिकाºयांची धावपळ उडाली आहे. ही सर्व आकडेवारी घेऊन थेट मुख्यमंत्र्यांसमोर तिचे सादरीकरण होणार असल्याने याबाबतचे नियोजन करण्यासाठी सर्वजण कार्यरत झाले आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgovernment schemeसरकारी योजना