शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसच्या बैठकींना बोरगे, देसार्इंची हजेरी

By admin | Updated: March 31, 2017 00:53 IST

जिल्हा परिषदेचे राजकारण : सभापती निवडींसाठी बैठक; फूट न पडण्यासाठी सूचना; सदस्य पुन्हा सहलीवर रवाना

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहणारे राष्ट्रवादीचे शाहूवाडीतील सदस्य विजय बोरगे यांनी गुरुवारी चक्क दोन्ही कॉँग्रेसच्या बैठकांना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबरोबरच गैरहजर राहिलेल्या कॉँग्रेसच्या रेश्मा देसाई यांचे पती अर्थात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनीही बैठकीनंतर सतेज पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांना पुन्हा सहलीवर पाठविण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी गटातील अजूनही चार सदस्य आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी हालचाली करीत गुरुवारी ताराबाई पार्कमधील सर विश्वेश्वरैया सभागृहामध्ये दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांची बैठक घेतली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्यात फूट पडता कामा नये याच्या स्पष्ट सूचना सदस्यांना देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश पाटील (चंदगड), राजेश लाटकर, जयवंतराव शिंपी, बंडा माने, युवराज पाटील, भैया माने, अनिल साळोखे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी आपली संख्या एकानेही कमी न होता वाढलीच पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित असलेले बोरगे गुरुवारी पहिल्या रांगेत बसले आहेत. एका सदस्याने संंख्या वाढली आहे. आता राहुल देसाईसुद्धा खाली आले आहेत. तेव्हा कुणीही वेगळा विचार करू नये, अशा पद्धतीने कडक सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीनंतर सर्वच सदस्यांना लक्झरी बसमधून सहलीवर पाठविण्यात आले असून, रविवारी (दि. २) संध्याकाळी ही सर्व मंडळी आता कोल्हापुरात परतणार आहेत. सदस्यांना ‘व्हीप’ लागूदोन्ही कॉँग्रेसच्या उपस्थित सदस्यांना गुरुवारीच पक्षाचा ‘व्हीप’ लागू करण्यात आला. त्यासाठी सतेज पाटील यांनी यंत्रणा कामाला लावली होती. पुन्हा नंतर व्हीप लागू करताना धावपळ होते; म्हणून या बैठकीतच सदस्यांच्या सह्या घेऊन त्यांना व्हीप लागू करण्यात आला. कार्यकर्ते, नातेवाइकांनाही काढले बाहेरबैठक सुरू असताना जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे नातेवाईक आणि काही कार्यकर्तेही आत बसून होते. मात्र, सुरुवातीला सतेज पाटील आले. नंतर मुश्रीफ आले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नातेवाइकांनाही बाहेर काढून सक्त शब्दांत सदस्यांना सूचना देण्यात आल्या. यानंतर सदस्य थेट लक्झरीतच बसले. ‘भोगावती’मुळे पी. एन. अनुपस्थितकॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे भोगावती साखर कारखान्यासंदर्भात देवाळे येथे मेळावा असल्याने आले नसल्याचे यावेळी सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांचे सदस्य सहलीवर जाणार नसल्याचे कळले. मी आलो, मतदार आणलाय का?बैठकीच्या ठिकाणी शाहूवाडीचे विजय बोरगे उपस्थित आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. याचदरम्यान खाली राहुल देसाई आले होते. ते बैठकीनंतर सतेज पाटील यांना भेटणार होते. याबाबत देसाई यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘निरोप आलाय म्हणून आलोय; पण मी एकटाच आलोय. मतदार आणलाय का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.