शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवाजी पूलप्रश्नी आज चर्चा

By admin | Updated: March 14, 2017 23:57 IST

अन्यथा जुन्या शिवाजी पुलावर विटांचे बांधकाम करून तो वाहतुकीसाठी कायमचा बंद करण्याचा इशारा

कोल्हापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची फाईल आता मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवली आहे. आज, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर सखोल चर्चा होऊन ती अंतिम मंजुरीसाठी संसदेकडे पाठविण्यात येणार आहे.रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम दहा दिवसांत सुरू करून ते मे महिन्याअखेर पूर्ण करावे; अन्यथा जुन्या शिवाजी पुलावर विटांचे बांधकाम करून तो वाहतुकीसाठी कायमचा बंद करण्याचा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने ३ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यामुळे या पर्यायी पुलाच्या कागदपत्रांची फाईल आता गतीने हलली आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे हे दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. पुरातत्त्व खात्याने काही नियमांत सुधारणा करून आवश्यक त्या कागदपत्रांसह शिवाजी पुलाबाबतची फाईल मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवली आहे. त्यावर आज, बुधवारी चर्चा करण्यात येऊन मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी ती संसदेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता पर्यायी शिवाजी पुलाच्या कागदपत्रांची फाईल मंजुरीसाठी गती आली आहे. पर्यायी शिवाजी पुलासंदर्भातील विषय आज, बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी ठेवला आहे. त्यानंतर संसदेतील अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात केली जाईल. या संदर्भात आपण स्वत: दिल्लीत थांबून पाठपुरावा करीत आहोत. - आर. के. बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग