गडहिंग्लज : येथील नगरपालिकेचे २०१४-१५ चे सुधारित आणि २०१५-१६ चे अनुमानित अंदाजपत्रक हे दोन्ही तुटीचे आहेत. शासनाचा अकौंट कोड आणि नगरपरिषद अधिनियमानुसार त्याला मान्यता देता येणार नाही. त्यामुळे दुरुस्तीसह अंदाजपत्रक नव्याने मांडण्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे अंजदापत्रकाला विरोध दर्शवून विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. तर कोणतीही कर वाढ नसलेला हा अर्थसंकल्प नियमानुसार असल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादीतर्फेकरण्यात आला.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी अर्थसंकल्प मांडला. विरोधी जनता दल-जनसुराज्य आघाडीच्या सभात्यागानंतर बहुमताने त्यास मंजुरी देण्यात आली. प्रशासनाची बाजू मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सांभाळली. सुरुवातीला नगराध्यक्षा घुगरे या बसूनच भाषण करीत होत्या. त्यास नरेंद्र भद्रापूर यांनी आक्षेप घेतला. अंदाजपत्रकावरील भाषण हे अध्यक्षांचे अभिभाषण असल्यामुळे अध्यक्षांनी उभे राहून भाषण करावे, अशी विनंती विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरींनी केली. त्यानंतर त्यांनी उभे राहून भाषण केले.चर्चेत प्रा. कोरी, किरण कदम, हारुण सय्यद, मंजूषा कदम, बसवराज आजरी, नितीन देसाई व दादू पाटील यांनी भाग घेतला. सभेस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्यासह सर्व नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)विरोधकांचा आक्षेप२०१४-१५ चा अर्थसंकल्प २ कोटी ११ लाख ६० हजार ४०८, तर २०१५-१६ चा २७ लाख १८ हजार ७१० इतक्या तुटीचा आहे. नियमानुसार वर्षअखेरीस किमान रोख रक्कम २ लाख इतकी शिल्लक दिसून येत नसल्यामुळे तुटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देऊ नये, अशी लेखी मागणी विरोधी आघाडीतर्फे नगराध्यक्षांकडे करण्यात आली.सत्ताधाऱ्यांचा दावा२०१४-१५ च्या अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लकघेण्यात आली आहे. मात्र, २०१५-१६ मधील लेखा नोंदी दुहेरी पद्धतीच्या असल्यामुळे शिल्लक रकमा निरनिराळ्या शिर्षकाखाली आहेत. नोंव्हेंबर २०१४ अखेरची शिल्लकच ९,६८,५०० इतकी आहे. त्यामुळे विरोधकांचा आक्षेप चुकीचा असून दोन्ही वर्षांचे अंदाजपत्रक नियमानुसार व शिलकीचेच आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
गडहिंग्लज पालिकेत विरोधकांचा सभात्याग
By admin | Updated: February 25, 2015 00:44 IST