शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सदस्यांचा सभात्याग

By admin | Updated: May 25, 2016 01:11 IST

शिक्षण समितीत धुसफूस : कामे होत नसल्याचा आरोप; तक्रारींची दखल घेत नसल्याने बदलीची मागणी

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले मनमानी व एकतर्फी कारभार करीत असल्याचा आरोप करीत सभापती अभिजित तायशेटे यांच्यासह नऊ सदस्यांनी शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील धुसफूस चव्हाट्यावर आली. समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी एक वाजता बैठकीस प्रारंभ झाला. शिक्षक बढती, पदोन्नती, बदली या प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्यामुळे शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी एस. व्ही. पाटील, संभाजी लोहार यांनी प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव केला. त्या ठरावावर सदस्यांनी भाष्य केले नाही. दरम्यान, महिन्यापूर्वी गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील मुख्याध्यापकांना आठवीचा वर्ग बेकायदेशीरपणे सुरू केल्याच्या आरोपावरून निलंबित केले. त्यांचे निलंबन मागणी करूनही मागे का घेतले नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर चौगुले यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सभापती तायशेटे, सदस्य राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, बाबासाहेब माळी, शिवप्रसाद तेली, महेश पाटील, सुजाता पाटील, मंदा घाटगे, स्वाती ढवण यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापती तायशेटे यांच्या कक्षात पत्रकारांना माहिती देताना आबिटकर म्हणाले, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले शिक्षकांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. सदस्यांनी कोणतेही प्रशासकीय काम सांगितल्यास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. शिंगणापूर येथील निवासी शाळेसंबंधी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. त्या बैठकीस पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले नाही. जिल्ह्णाबाहेर जाण्यासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची अडवणूक करीत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची बदली करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे करणार आहे. (प्रतिनिधी)