शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’साठी १५ फेब्रुवारीपूर्वी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:35 IST

केंद्रीय अर्थमंत्री आज करणार चर्चा

कोल्हापूर : कोल्हापुरातील एलबीटी असेसमेंटमध्ये निर्माण झालेल्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ यांची राज्य शासनस्तरावर १५ फेब्रुवारीपूर्वी संयुक्त बैठक आयोजित करू, अशी ग्वाही नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन चर्चा केली. अध्यक्ष गांधी यांनी त्यांना लेखी निवेदन दिले. दरतफावतीमुळे येणाऱ्या अडचणी व त्यामुळे व्यापारी-उद्योजकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची कल्पना त्यांनी दिली. या सर्व विषयांवर संयुक्त बैठकीत चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. व्यापारी, उद्योजकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सचिव म्हैसकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे जनरल सेक्रेटरी सागर नगारे, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे महामंत्री स्वप्निल शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)केंद्रीय अर्थमंत्री आज करणार चर्चाअर्थसंकल्पाबाबत व्यापार, उद्योग जगताच्या प्रतिक्रिया, अपेक्षा जाणून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, अर्जुन राम मेघवाल हे व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी आज, शुक्रवारी संवाद साधणार आहेत. नवी दिल्लीतील या बैठकीसाठी ‘फिक्की’चे संचालक ललित गांधी यांना निमंत्रित केले आहे. सुनावणीस हजर राहण्याचे आवाहनएल.बी.टी. कर निर्धारणाच्या सुनावणीस सर्व नोंदणीकृत व्यापारी, फर्म यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास स्थानिक संस्था कर नियम २०११ चे ३३ (५) व (६) प्रमाणे योग्य निर्णयशक्तीनुसार स्थानिक संस्था कराची रक्कम निर्धारित करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.