शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

इचलकरंजीच्या विकास प्रस्तावांसाठी बैठक

By admin | Updated: January 16, 2015 23:40 IST

सुरेश हाळवणकर : मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक

इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणीपुरवठा, नगरपालिका हद्दवाढ, शहर बस वाहतुकीसाठी सीएनजी बसेस, रिंग रोड विस्तारीकरणासाठी बारा कोटी रुपयांचा प्रस्ताव असे शहर विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात मुंबई येथे आयोजित केली जाईल, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.नगरपालिकेमधील नगराध्यक्षांच्या कार्यालयात आमदार हाळवणकर, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, आरोग्य सभापती सुजाता भोंगाळे, पाणी पुरवठा सभापती रवी रजपुते, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, तानाजी पोवार, महादेव गौड, मदन झोरे, विठ्ठल चोपडे, चंद्रकांत शेळके, आक्काताई कोटगी, सागर चाळके, आदींच्या समवेत आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये शहर विकासाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हाळवणकर म्हणाले, काळम्मावाडी नळ योजनेविषयीचा प्रस्ताव नगरपरिषद आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्याबरोबरच नजीकच्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कृष्णा योजनेची बारा किलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलण्यात येईल. हा २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरोत्थान योजनेतून शासनाकडून मंजूर करून घ्यावा लागेल. पाच किलोमीटर त्रिजेच्या अंतरात असलेल्या ग्रामपंचायतीकडून नगरपालिका हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. इचलकरंजी एक स्मार्ट सिटी करण्याचे ध्येय आहे. तसेच शासनाच्या ७५ टक्के अनुदानातून नळाला मीटर बसविण्यात येतील. हा सात कोटी रुपयांचा प्रस्ताव असून, ज्यामुळे पाण्याची बचत होईल. अशा विविध प्रस्तावांसाठी मुख्यमंत्र्यांकडे नगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, मुख्याधिकारी, आदींसह बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल. (प्रतिनिधी)राजकारणाच्या पलीकडे शहर विकासाचे ध्येयराजकारणाच्या पलीकडे जाऊन शहराच्या विकासावर आपण लक्ष केंद्रित केले असल्याचे सागंत आमदार हाळवणकर म्हणाले, नगराध्यक्षांचे बंड आणि शहर विकास आघाडीचा पाठिंबा असल्या राजकारणात मला स्वारस्य नाही. नगराध्यक्षा कोणीही असोत, त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीत नागरिकांची विकासकामे व्हावीत, हाच हेतू आहे. सध्या निवडणुका नसल्याने फोडाफोडीचे राजकारण करण्यात काही अर्थ नाही; पण नगराध्यक्षा बिरंजे यांनी केलेले बंड समर्थनीय आहे.वीज अनुदान कायम करण्यासाठी प्रयत्नमाजी ऊर्जा सचिव अजय मेहता यांनी ऊर्जा मंत्र्यांना चुकीची माहिती दिल्यानेच शासनाचे वीज अनुदान एकाच महिन्यात बंद झाले आहे. हे अनुदान कायमपणे चालू करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रयत्न सुरू आहेत. साधारणत: पुढील आठवडाभरात होणाऱ्या मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याचे आमदार हाळवणकर यांनी स्पष्ट केले.