शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

‘एफआरपी’बाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:24 IST

कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या ...

कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.एफआरपीबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक रविवारी कोल्हापुरात झाली. यामध्ये ऊस दरावरून निर्माण झालेल्या कोंडीवर चर्चा झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. शेतकºयांची कर्जे थकली असून, खते, बियाणे व औषधांसाठी शेतकºयांकडे पैसे नाहीत. याबद्दल शेतकºयांमध्ये असंतोष असल्याची चर्चाही बैठकीत झाली; पण एफआरपीची रक्कम व बॅँकांकडून मिळणारी उचल यात मोठी तफावत असून, तेवढी कर्जरूपाने उचल वाढवून देण्यास बॅँका तयार नसल्याने एकरकमी पैसे देणेच अशक्य आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुरुवारच्या बैठकीपूर्वी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती कारखानदारांनी केली. त्यानुसार मंगळवारी मोजकेच कारखानदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये मदतीची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते.‘स्वाभिमानी’च्या धास्तीने भरणा थांबविलाकारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्क्यांप्रमाणे उसाची बिले भरण्याची तयारी केली होती. आज, सोमवारपासून त्याचा भरणा संबंधित बॅँकांत केला जाणार होता; पण ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने एफआरपीचे तुकडे करून पैसे दिले तर कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला होता. कारखानदारांनी त्याचा धसका घेऊन भरणाच थांबविला.