शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील-कोरे यांच्यात बैठक

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

गोकुळ, केडीसीसीचे राजकारण : राष्ट्रवादीच्या दुय्यम फळीतील नाराजही भेटले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) व केडीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री विनय कोरे यांची रविवारी चर्चा केली. या चर्चेदरम्यान जागावाटपासह नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुय्यम फळीतील नाराज गटही भेटून गेले.रविवारी सायंकाळी अजिंक्यतारा येथे सतेज पाटील व विनय कोरे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ‘गोकुळ’ निवडणुकीत समर्थक व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. जिल्हा बँकेसाठी ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून अर्ज दाखल करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे. चर्चेदरम्यान दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी नेत्यांनी डावलेल्या दुय्यम फळीतील नाराज नेत्यांनीही पाटील व कोरे यांच्याशी चर्चा केली. त्यात आमच्या कामाची दखल घ्यावी. आम्ही आपणाला साथ देऊ, अशी ग्वाही या दुय्यम फळीतील नेत्यांनी दोन्ही नेत्यांना दिली. बैठकीला दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त जवळचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चर्चेत काँग्रेसमधील एक नाराज गटही यावेळी दोन्ही नेत्यांना भेटला. या नाराज गटाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांना दोन जागा व भाजपासाठी एक जागा कशासाठी सोडायची, याबद्दल नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)नव्या चेहऱ्यांना संधी देणारकेडीसीसीसह ‘गोकुळ’मध्ये हंगामी काळात एकत्र आल्यानंतर बँकेत आपल्या पॅनेलमध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत यावेळी दोन्ही नेत्यांनी दिले. आगामी काळात बँकेसह ‘गोकुळ’चा कारभार अत्यंत अभ्यासपूर्ण करावा लागणार असल्याने अभ्यासू कार्यकर्त्यांना दोन्ही ठिकाणी संधी देण्यावर विचारविनिमय करण्यात आला. दोन्ही संस्थांच्या निवडणुकीबाबत काय परिस्थिती आहे, याची चाचपणी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली. नाराज गटासह प्रमुख नेत्यांना स्वतंत्ररित्या बोलावून चर्चा करण्यात आली.