शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच सभा खेळीमेळीत

By admin | Updated: July 17, 2016 01:03 IST

गडहिंग्लज नगरपालिका : विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी टाळली टीकाटिप्पणी

गडहिंग्लज : गेली पाच वर्षे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे, आरोप-प्रत्यारोप करणारे आणि कोणत्याही लहान-सहान कारणावरून सभागृह डोक्यावर घेणाऱ्या दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी मौन पाळणे पसंद केले. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात आटोपलेली येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच खेळीमेळीत पार पडली. नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यांनी प्रारंभीच वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून अजेंड्यावरील विषयांवर आणि मुद्द्यांवरच बोलावे, असे आवाहन केले. त्यानंतर नरेंद्र भद्रापूर यांनी पाच वर्षांतील आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे सभेची सुरुवातच सकारात्मक झाली. एका सफाई कामगाराला सेवेत कायम करण्याच्या आणि अनुकंपा तत्त्वाखाली एका वाहनचालकाच्या नेमणुकीबाबत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी आग्रही भूमिका घेतली. मुरगूड पालिकेच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची सूचना त्यांनी केली. मात्र, शासन निर्णय व नियमाप्रमाणेच कार्यवाही होईल, असे मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी स्पष्ट केले. चर्चेत रामदास कुराडे, हारुण सय्यद, लक्ष्मी घुगरे, बसवराज खणगावे यांनीही भाग घेतला. (प्रतिनिधी)