कोल्हापूर: कसबा बावडा पॅव्हेलियन कोविड सेंटरमध्ये औषधांची मागणी लक्षात घेऊन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी तत्काळ औषधे उपलब्ध करून देत रुग्णांना दिलासा दिला. यशराजराजे छत्रपती यांनी ही इजेक्शन, टॅबलेट्स अशी जवळपास ८० हजारांची औषधे कोविड सेंटरचे प्रमुख गजानन बेडेकर यांच्याकडे नेऊन दिली.
कसबा बावड्यातील हे केअर सेंटर लोकवर्गणीतून चालवले जात आहे. पण, रुग्णसंख्या वाढेल तसा औषधांचा साठा कमी पडत असल्याने कोविड सेंटरकडून औषधे पुरवण्याचे आवाहन केले होते. मालोजीराजे यांच्याकडे देखील मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी औषधांचा तातडीने पुरवठा केला. छत्रपती घराणे कायमच पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देखील दिली. ही औषधे सेंटरच्या डॉ. भक्ती कुलकर्णी यांनी स्वीकारली. या सर्व घडामोडीत गणेश शिंदे,धनराज वाडकर, सचिन चौगुले,पवन साळोखे,ऋषिकेश ठोंबरे,शामराव करपे, राहुल चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
३००५२०२१-कोल-कोविड केअर
फोटो: कसबा बावडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते औैैषधे वाटप करण्यात आली.