शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेच्या वैद्यकीय परंपरेस ‘म्हैसाळ’ प्रकरणाने कलंक

By admin | Updated: March 14, 2017 00:25 IST

खिद्रापुरेची करणी : कायदा नाचवित भ्रूणहत्येचा कत्तलखाना

सचिन लाड --सांगली--मिरज शहर. सांगलीपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला मोठी परंपरा आहे. वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेत अनेक जुन्या व नामवंत डॉक्टरांची तिसरी पिढीही वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहे. वॉन्लेस रुग्णालयामुळे मिरजेचा नावलौकिक वाढला. याच शहरापासून दहा किलोमीटरवर म्हैसाळ हे कर्नाटक सीमेवरील गाव. या गावात भ्रूणहत्येच्या कत्तलखाना चालविणाऱ्या खिद्रापुरेच्या कारनाम्यामुळे वैद्यकीय व्यवसायाला कलंक लागला आहे. कनवाड (ता. शिरोळ) हे खिद्रापुरेचे गाव. बीएचएम पदवी घेतल्यानंतर रुग्णालय कुठे काढायचे, असा त्याला प्रश्न पडला. त्याने म्हैसाळ गाव निवडले आणि १२ वर्षांपूर्वी एका लहान गाळ्यात रुग्णालय सुरु केले. या रुग्णालयातून फारशी काही कमाई होत नसल्याचे लक्षात येताच तो कर्नाटकातील काही डॉक्टरांच्या संपर्कात आला. वंशाला मुलगा पाहिजे, या जुन्या विचाराच्या पगड्याची त्याने मदत घेतली आणि पडद्याआड राहून गर्भपात केंद्र सुरू केले. स्त्री-रोगतज्ज्ञ पदवी नाही, गर्भपात व सोनोग्राफी तपासणीचे ज्ञान नाही, साधे इंजेक्शन हातात धरायची परवानगी नसताना, केवळ होमिओपॅथीची ‘डॉक्टर’ पदवी नावे असल्याच्या जोरावर त्याने गेली आठ वर्षे महिलांच्या जिवाशी खेळ सुरू ठेवला. त्याच्या रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या कत्तलखान्याची माहिती नव्हती, याबद्दल अजूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि आरोग्य यंत्रणा जणू काही माहीत नसल्यासारखे पळू लागली. खिद्रापुरे नेमके काय करतो, याबद्दल एका सूज्ञ नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन चौकशीसाठी आरोग्य पथक पाठविले; पण पथकाने केवळ ‘सहल’ म्हणून म्हैसाळचा शासकीय दौरा केला. कोणत्याही प्रकारचे गर्भपात केले जात नसल्याचा अहवाल देऊन खिद्रापुरेला ‘क्लीन चिट’ दिली. स्वाती जमदाडेंचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर पोलिस व वैद्यकीय पथकाने छापा टाकून गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला. मग म्हैसाळचा दौरा करणाऱ्या आरोग्य समितीला त्यावेळी का औषधे सापडली नाहीत, सोनोग्राफी यंत्राचे दर्शन का झाले नाही, पोलिसांनी धडक मोहीम राबविल्यानंतरच हे कसे सापडले आदी प्रश्न समोर येत आहेत. जिल्ह्यात गर्भपाताच्या घटना उघडकीस आल्यानंतर यापूर्वी अनेक सोनोग्राफी केंद्रे सील केली गेली. विविध समाजघटकांचा उद्रेक, संतप्त जमावाची रुग्णालयांवर दगडफेक अशा घटनानंतरच आरोग्य यंत्रणेला जाग येते आणि दोषी डॉक्टरांना बेड्या ठोकल्या जातात. स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांड उघडकीस आल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. कायदा कडक केला असला तरी, आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसारख्या कोवळ्या कळ्यांचे मारेकरी अजूनही शांत बसलेले नाहीत. त्याच्या रुग्णालयरूपी कत्तलखान्याचे व पापखुणांचे प्रशासकीय यंत्रणेला दर्शन झाले. हत्याकांडाच्या क्रूर कहाण्यांचा पोलिसांच्या तपासातून उलगडा होत आहे. खिद्रापुरेचा कत्तलखाना गेली आठ वर्षे कसा सुरू राहिला, त्याच्या ‘रॅकेट’ची व्याप्ती कशी वाढत गेली, कर्नाटकातील डॉक्टर त्याच्या संपर्कात कसे आले, निनावी तक्रार येऊनही प्रशासन व आरोग्य विभागाने खिद्रापुरेला कोणत्याआधारे ‘क्लीन चिट’ दिली, याचा वेध घेणारी मालिका आजपासून....आणखी किती स्वाती?खिद्रापुरेच्या रुग्णालयात वर्षभरापूर्वी एका महिलेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला होता. पण हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले नाही. स्थानिक पातळीवरच मिटविण्यात आले. यामध्ये मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे. स्वाती जमदाडेंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या माहेरकडील लोकांनी दाखविलेल्या धाडसामुळे हा कत्तलाखाना उघडकीस आला असला, तरी खिद्रापुरेच्या हातून आजपर्यंत किती स्वातींचा बळी गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.