शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी मिळतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच १५ ...

नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी मिळतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच १५ टक्के कोट्यातून प्रवेश घेताना पुन्हा विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार आहे. केवळ नीट परीक्षेवर लक्ष देऊन ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, त्यांनी याचिका दाखल केल्यास प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याचा धोका आहे. तामिळनाडूप्रमाणे इतर राज्यांनी अनुकरण केल्यास नीट परीक्षेला अर्थ राहणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बारावीतील गुणांच्या आधाराऐवजी ‘नीट’ परीक्षेद्वारेच वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे मत प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक, समुपदेशकांनी व्यक्त केले.

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

राज्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेने संमत केले. या विधेयकामुळे सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर बारावी परीक्षेतील गुणांच्याआधारे प्रवेश मिळणार आहे.

धक्कादायक निर्णय

बारावीच्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश देण्याचा राज्यांना अधिकार आहे. तामिळनाडूपूर्वी आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू-काश्मीर राज्याने असा निर्णय घेतला होता. तेलंगणा, आंध्रप्रदेशने हा निर्णय रद्द करून नीट परीक्षा स्वीकारली आहे. माझ्या मते तामिळनाडूने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्याचे अन्य राज्यांनी अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. सर्व राज्यांनी ‘नीट’प्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविणे विद्यार्थी हिताचे आहे.

- अशोक शेट्टी, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक

देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर आणि पारदर्शकपणे व्हावी, या उद्देशाने नीट परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे बारावीतील गुणांवर प्रवेश देणे योग्य ठरणार नाही. ज्या राज्यांना नीट नको आहे, त्यांनी किमान सीईटी, तरी घेतली पाहिजे.

-रितेश दलाल, नीट परीक्षेचे मार्गदर्शक

विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

हा एक चांगला निर्णय आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असलेला अचूक अभ्यास किंवा थोडे मूलभूत जे सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे प्राधान्य दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांनी राज्य बोर्ड आणि सीबीएसई अभ्यासक्रमामधून अभ्यास केला आहे, त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी मिळते. माझे मत नीट परीक्षा असावी. या परीक्षेमुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशाची समान संधी मिळते.

- कस्तुरी केसरकर

वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी दोन ते अडीच वर्षे विद्यार्थी करतात. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. कोरोनामुळे बारावीची अंतिम लेखी परीक्षा झालेली नसल्याने ‘नीट’द्वारेच प्रवेश व्हावेत.

- आयुष कदम